Video: आगीत रोबोटची दमदार कामगिरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

अग्निशमन दलाच्या ताफ्यात नुकताच दाखल झालेल्या आधुनिक रोबोटने वांद्र्यातील टेलिफोन एक्सचेंजमधील आग विझवण्यासाठी महत्वाची कामगिरी बजावल्याने अग्निशमन दल जवानांना मोठी मदत झाली.

मुंबई : अग्निशमन दलाच्या ताफ्यात नुकताच दाखल झालेल्या आधुनिक रोबोटने वांद्र्यातील टेलिफोन एक्सचेंजमधील आग विझवण्यासाठी महत्वाची कामगिरी बजावल्याने अग्निशमन दल जवानांना मोठी मदत झाली.

बिकेसी जवळील टेलिफोन एक्सचेंजच्या इमारतीला आज भीषण आग लागली. या आगीत इमारतीमधील 3 मजले जळून खाक झाल्याने संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते. इमारतीच्या आतील भागाचा अंदाज येत नसल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात अडचणी येत होत्या. अग्निशमन दलातील जवानांनी नव्या रोबोटचा वापर करून यावेळी आग विझवण्याचा प्रयत्न केला.

या रोबोटचे वैशिष्ट्य म्हणजे या रोबोटला सर्व बाजूने कॅमेरा बसवण्यात आले आहेत, त्यामुळे हा रोबोट 360 डिग्री मध्ये फिरून काम करू शकतो. आगीच्या भक्षस्थानी जीवघेण्या, अडचणीच्या ठिकाणी जाऊन काम करण्याची क्षमता या रिबोटची आहे. या रोबोटच वैशिष्ट्य म्हणजे या रोबोट मध्ये सेन्सर असल्याने या सेन्सरमुळे हा रोबोट एखाद्या आगीच्या ठिकाणी कुणी अडकला असल्यास त्याचा नेमका शोध घेऊ शकतो.

हा रोबोट वायरलेस मॉनिटरच्या मदतीने नियंत्रित करता येतो. म्हणून एखाद्या मोठ्या आगीच्या वेळी या रोबोटच्या मदतीने अडचणीच्या भागात देखील नेमकी काय परिस्थिती आहे याचं आकलन करता येऊ शकते. अग्निशमन दलाने या रोबोटचा पुरेपूर आग विझवण्यासाठी पुरेुपुर वापर केल्याने अग्निशमन दलाला मोठी मदत मिळाली.पुढील पाच वर्षात आणखी पाच नवे आधुनिक रोबोट घेण्याचा पालिकेचा मानस आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nice robotic performance in the Mumbai fire