नायजेरियन अमली पदार्थ तस्करांचा नागरिकांवर हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

मुंबई - भायखळ्याच्या एकता नगरमधील रहिवाशांवर नायजेरियन अमली पदार्थ तस्करांनी शुक्रवारी हल्ला केला. भायखळा आणि सॅण्डहर्स्ट रोड स्थानकादरम्यान रेल्वे रूळांवर येण्याचा मार्ग बंद केल्यामुळे नायजिेरयन तस्करांनी दगडफेक केली. यात 10 ते 12 स्थानिक नागरिक जखमी झाले. याप्रकरणी 10 नायजेरियन तस्करांवर भायखळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भायखळा आणि सॅण्डहर्स्ट रोड स्थानकादरम्यान रेल्वे रूळांवर नायजेरियन तस्करांचा वावर असतो. या परिसरात अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होते. त्याचा मनस्ताप स्थानिकांना होत होता. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी फूटओव्हर ब्रिजवरून रेल्वे रूळांवर उतरण्याचा मार्गच बंद केला. अमली पदार्थ खरेदी करण्यासाठी कोण येत नाही हे लक्षात येताच शुक्रवारी 10 ते 12 नायजेरियन तस्करांनी हा मार्ग पुन्हा खुला करण्याचा प्रयत्न केला. या वेळी स्थानिक आणि नायजेरियन तस्करांमध्ये झटापट झाली. नागरिकांसह पोलिसांनीही नायजेरियन तस्करांचा पाठलाग सुरू केला. पण 10 ते 12 नायजेरियन तस्कर पळून जाण्यात यशस्वी झाले. 

Web Title: Nigerian drug smugglers attacked the citizens