दीड कोटीच्या कोकेनसह नायजेरियन तरुणास अटक

दीड कोटीच्या कोकेनसह नायजेरियन तरुणास अटक

नालासोपारा ः नालासोपारा पूर्व प्रगतीनगर परिसरात पालघर एटीएसने कारवाई करून एक हजार 496 ग्रॅम वजनाचे सुमारे दीड कोटी रुपये किमतीचे कोकेन जप्त केले आहे. याबाबत तुळिंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून एका नायजेरियन तरुणास अटक केली आहे; तर त्याचा एक साथीदार पसार झाला आहे.

बुधवारी (ता. 21) ही कारवाई केली. डेयेटा जेरोम (30) असे अटक केलेल्या नायजेरियन तरुणाचे नाव आहे. नालासोपारा पूर्व प्रगतीनगर परिसरात एक नायजेरियन तरुण कोकेन हे अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पालघर दहशतवादविरोधी पथकातील पोलिस हवालदार महेश पागदरे यांना मिळाली होती.

यावरून पोलिस अधीक्षक गौरव सिंह, एटीएसप्रमुख एपीआय मानसिंग पाटील, पोलिस कर्मचारी सुनील देशमुख, चंद्रकांत ढाणे, प्रकाश कदम, सचिन कदम, जगदीश गोवारी, सुभाष आव्हाड यांनी सापळा रचून संशयित नायजेरियन तरुणाला ताब्यात घेऊन त्याची झडती केली. या वेळी त्याच्याकडे एक हजार 496 ग्रॅम कोकेन सापडले. त्याची बाजारभावाप्रमाणे दीड कोटी रुपये किंमत असल्याचे तापासाधिकारी यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com