कचरामुक्त भिवंडीसाठी आता रात्रपाळी 

शरद भसाळे
सोमवार, 30 एप्रिल 2018

भिवंडी - स्वच्छ भारत अभियानांतर्गत भिवंडी महापालिका क्षेत्रात रोज जमा होणारा कचरा नियमित उचलण्याची मोहीम सुरू असतानाच महापालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी आता ‘एक पाऊल स्वच्छतेकडे’ मोहिमेंतर्गत रोज रात्रीही कचरा उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली असून त्यांच्या या संकल्पनेला नगरसेवकांसह नागरिकांनीही पाठिंबा देत प्रशासनाचे स्वागत केले आहे.

भिवंडी महापालिका कार्यक्षेत्रात असलेल्या सुमारे ४५० कचराकुंड्या मुक्त करण्याचा संकल्प महापालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी आरोग्य विभागाच्या झालेल्या बैठकीत केला आहे. 

आयुक्त हिरे यांनी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ‘एक पाऊल स्वच्छतेकडे’ मोहिमेंतर्गत भिवंडीतील ९० वॉर्डमधील १ ते ५ प्रभागांत दिवस आणि रात्री अशा दोन वेळा कचरा उचलून तो निश्‍चित वेळेनुसार डम्पिंग ग्राऊंडवर डंप करून टाकण्याचा विशेष कृती आराखडा तयार केला आहे. पहिल्या टप्प्यात पाच प्रभागांसाठी १० डंपर आणि १०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा साचला जातो, अशा ठिकाणाहून रात्री १० ते ३ वाजेपर्यंत कचरा उचलण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे सकाळी स्वच्छ रस्ते व कचरामुक्त शहर दिसेल. शांतीनगर, धामणकर नाका रोड, ठाणे रोड, दरगाह रोड, कल्याण रोड, नारपोली, बाजारपेठ, म्हाडा कॉलनी, पद्मनगर, कामतघर, अंजुरफाटा, देवजीनगर गैबीनगर, कोंबडपाडा अशा विविध ठिकाणी स्वच्छतेची मोहीम सुरू झाली आहे. बैठकीस आरोग्य विभागाचे विभागप्रमुख उपायुक्त दीपक कुरळेकर, आरोग्य निरीक्षक हेमंत गुळवी यांच्यासह प्रभाग अधिकारी उपस्थित होते.

रात्रीच्या स्वच्छता मोहिमेत सुमारे १०० टन कचरा उचलला जात असून हा कचरा अधिक प्रमाणात उचलण्याचा आरोग्य विभागाचा मानस आहे. तसेच प्लास्टिकमुक्त भिवंडी ही मोहीम युद्धपातळीवर राबविण्याचे आदेश दिले आहेत. 
- मनोहर हिरे, आयुक्त, महापालिका, भिवंडी

Web Title: Night shift for waste-free Bhiwandi