अनुराग कश्यप यांनी सरळ सरळ बाळासाहेब ठाकरे यांची बदनामी केलीये - निलेश राणे

सुमित बागुल
Sunday, 20 September 2020

उद्धव ठाकरे यांच्यामुळे मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं - उद्धव ठाकरे 

मुंबई : प्रसिद्ध सिने दिग्दर्शक अनुराग कश्यप याने एका कार्यक्रमात महाराष्ट्रात मला सुरक्षित वाटतं असं म्हटलंय. महत्त्वाची बाब म्हणजे अनुराग कश्यप याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं असं म्हंटल्यानंतर आता यावर राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरवात झाली आहे. अनुराग कश्यपच्या प्रतिक्रियेनंतर राणे कुटुंबाकडून अनुराग काश्यपवर आणि अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आलाय.

आधी जाणून घेऊयात अनुराग कश्यप काय म्हणालात ?

प्रसिद्ध सिने दिग्दर्शक अनुराग कश्यप एका कार्यक्रम म्हणाला की, उद्धव ठाकरे यांच्या भूमिकांबद्दल माझी मतं वेगळी असू शकतात. मात्र उद्धव ठाकरे यांच्यामुळे मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं. महाराष्ट्रात गेल्या काही काळात ज्या गोष्टी घडतायत त्यामुळे एक पक्ष म्हणून शिवसेनेबाबत माझं मत, शिवसेनेबाबतची माझ्या मनातील प्रतिमा पूर्णपणे बदलली आहे. हे सर्व उद्धव ठाकरेंमुळे घडलं. महाराष्ट्रात असताना मी माझी मतं खुलेपणाने मांडू शकतो, असं अनुराग कश्यप म्हणालाय.

महत्त्वाची बातमी - नागरिकांचा बेजबाबदार उघड, मुंबईत मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

महत्त्वाची बातमी - मुंबईत सध्या 34 हजार ऍक्टिव्ह रूग्ण, तब्बल 1200 रूग्ण गंभीर 

राणे कुटुंबाकडून आलेली प्रतिक्रिया

अनुराग कश्यपच्या वक्तव्यानंतर नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी याच प्रकरणावरून शिवसेनेवर निशाणा साधलाय. उद्धव ठाकरे यांच्यामुळे आज महाराष्ट्र सुरक्षित वाटतोय असं म्हणणाऱ्या अनुराग कश्यप यांना बाळासाहेबांच्या शिवसेनेबाबत वेगळं मत होतं का ? ही तर थेट बाळासाहेबांची बदनामी आहे असं ट्विट केलंय.

nilesh rane targest anurah kashyap and taunts shivsena over kashyaps comment about uddhav thackeray and maharashtra


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nilesh rane targest anurah kashyap and taunts shivsena over kashyaps comment