"पण जे स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला मान काय देणार" - निलेश राणे

सुमित बागुल
Wednesday, 30 September 2020

पवार साहेबांनी असं वक्तव्य करणं, आश्चर्य वाटतं... पण जे स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला मान काय देणार.

मुंबई : मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने सध्या स्थगिती दिली आहे. मराठा आरक्षणाला स्थगीती दिल्यानंतर मराठा समाज चांगलाच आक्रमक झालाय. अशात मराठा नेते उदयनराजे आणि संभाजीराजे छत्रपती हे देखील आक्रमक भूमिका घेतायत. अशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि मराठा आरक्षणावरून संभाजीराजे छत्रपती यांना आणि उदयनराजे भोसले यांना काल टोला हणाला होता.

उदयनराजे आणि संभाजीराजे यांना भाजपने राज्यसभेवर पाठवलं आहे , त्यामुळे ते भाजपाची भाषा बोलणार असं वक्तव्य शरद पवार यांनी केलेलं. याच वादात आता भाजपचे नेते निलेश राणे यांनी उडी घेतलीये.

महत्त्वाची बातमी : शासकीय अधिकारी त्रास देतात म्हणून 90 डॉक्टरांचे राजीनामे, शासकिय वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आरोप

शरद पवारांनी उदयनराजे आणि संभाजीराजे यांना टोला हाणल्यानंतर निलेश राणे यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त करत निशाणा साधला. निलेश राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, "पवार साहेबांनी असं वक्तव्य करणं, आश्चर्य वाटतं... पण जे स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला मान काय देणार. या वक्तव्यावरून मराठा समाजाला एवढं कळलं पवार साहेबांकडून आणि महाविकास आघाडीकडून मराठा आरक्षणासाठी योग्य काम होणार नाही.

महत्त्वाची बातमी : राज्यांच्या गुन्हेगारीची आकडेवारी आली समोर, UP नंतर एकूण गुन्हेगारीत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्गासाठीच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यात मराठ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे 10 टक्के आरक्षण नको. अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी सरकारकडे केली. राज्य सरकारने संभाजीराजे यांची मागणी मराठा समाजाची भूमिका असल्याचे मान्य करत याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही दिली. काल वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती.

nilesh rane targets ncp chief sharad pawar over maratha reservation


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nilesh rane targets ncp chief sharad pawar over maratha reservation