मोबाईल चोरीप्रकरणी नऊ जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

मुंबई - प्रवाशांची पाकिटे आणि मोबाईल चोरी करणाऱ्या नऊ सराईत गुन्हेगारांना नऊ दिवसांत वांद्रे रेल्वे पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. त्यामुळे मोबाईल आणि पाकिटांच्या चोरीच्या आठ गुन्ह्यांची उकल झाली आहे. 

गर्दीच्या वेळेत प्रवाशांचे मोबाईल आणि पाकिटे चोरणाऱ्यांवर कारवाईचे आदेश वरिष्ठांनी वांद्रे रेल्वे पोलिसांना दिले होते. त्यानुसार पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. 

वरिष्ठ निरीक्षक सुनीलकुमार जाधव यांच्या पथकातील जे. एस. सागवेकर, डी. एस. गिते, आर. के. पवार, आर. डी. पवार यांनी तपास करून नऊ आरोपींना गजाआड केले. आरोपींकडून चार महागडे मोबाईल, रोख रकमेसह पाकिटे आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत, असे जाधव यांनी सांगितले. पकडलेल्या  नऊ आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश सुनावण्यात आले आहेत, अशी माहिती जाधव यांनी दिली.

Web Title: Nine Arrested in Mobile Theft