नऊ इमारती धोकादायक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

मुंबई - म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत धोकादायक इमारतींची यादी तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. शहरातील नऊ इमारती यादीत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. आठवडाभरात यादी जाहीर केली जाणार असून, इमारतींमधील रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावण्यात येणार आहेत.

म्हाडाच्या हजारो उपकरप्राप्त इमारती आहेत. त्या अनेक वर्षे जुन्या असल्याने दर वर्षी पावसाळ्यापूर्वी त्यांचे सर्वेक्षण केले जाते. २०१५ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात म्हाडाद्वारे शहरातील आठ इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या होत्या. २०१६ मध्ये ११ इमारती ‘धोकादायक’च्या यादीत होत्या. यंदा पावसाळापूर्व सर्वेक्षणाला मार्चपासून सुरुवात झाली. सर्वेक्षणाचे कामही पूर्ण झाले आहे. त्यात शहरातील नऊ इमारती धोकादायक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

धोकादायक इमारतींतील रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Nine buildings are dangerous