'महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त'! अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याच्या फाइल्स बंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

सिंचन घोटाळ्याप्रकरणी अनेक दिवसांपासून अजित पवार यांची चौकशी सुरु होती. दरम्यान आता सिंचन घोटाळ्याशी संबंधित अमरावती विभागातील नऊ फाइल्स बंद होताना पाहायला मिळतायत. विदर्भात सिंचन प्रकल्प राबवताना विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाला अजित पवार यांनी विचारात न घेता निर्णय घेण्याचे आरोप अजित पवार यांच्यावर त्यांच्यावर ठेवण्यात आले होते. यापैकी आता नऊ फाईल्स बंद होताना दिसतायत.  

मुंबई : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला. या नंतर आता अजित पवार यांच्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येताना दिसतेय. लाचलुचपत विभागाकडून आता सत्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्यात क्लीन चीट मिळताना पाहायला मिळतेय. लाचलुचपत विभागाकडून याबाबतचं पत्रक काढण्यात येतंय. त्यामुळे सिंचन घोटाळ्यातील अजित पवारांची फाइल्स आता बंद होणार का? याबद्दल आता चर्चांना उधाण आलंय  

सिंचन घोटाळ्याच्या फाईल्स बंद करण्याचे आदेश ACB च्या अमरावती विभागानं दिले आहेत. या आदेशांची कागदपत्र  सकाळच्या हाती लागली आहेत. अप्पर पोलिसांच्या आदेशाने या फाईल्स नास्तीबंद म्हणजेच बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याचं  या पत्रकातून समजतंय. अमरावती विभागातील नऊ प्रकल्पांशी संबंधित या फाईल्स बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. बिपिन कुमार सिंह यांच्या सहीचं हे गोपनीय पत्र आता माध्यमांसमोर येतंय.   

काय आहेत अजित पवार यांच्यावर आरोप : 

- महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांना तांत्रिक मंजुरी मिळण्यापूर्वी निविदा मागवण्यात आल्या

- कंत्राट देताना पदाचा वापर करत प्रक्रियेचे उल्लंघन करण्यात आलं

- अपात्र कंत्राटदार निविदा जारी करण्यात आल्या

- प्रकल्पांचा निधी वाढवण्यात आला तसंच दर्जाहीन कामं करण्यात आली

No photo description available.

सिंचन घोटाळ्याप्रकरणी अनेक दिवसांपासून अजित पवार यांची चौकशी सुरु होती. दरम्यान आता सिंचन घोटाळ्याशी संबंधित अमरावती विभागातील नऊ फाइल्स बंद होताना पाहायला मिळतायत. विदर्भात सिंचन प्रकल्प राबवताना विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाला अजित पवार यांनी विचारात न घेता निर्णय घेण्याचे आरोप अजित पवार यांच्यावर त्यांच्यावर ठेवण्यात आले होते. यापैकी आता नऊ फाईल्स बंद होताना दिसतायत.  

Webtitle : nine files related to irrigation scam closed soon after ajit pawar takes oath as deputy CM

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nine files related to irrigation scam closed soon after ajit pawar takes oath as deputy CM