सोनेचोरीप्रकरणी नऊ जणांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

मुंबई - लाखोंचे दागिने चोरल्याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी नऊ जणांना अटक केली. शफीकउल्ला मंडल, पंकज पांढरकामे, समीर राणा, तोयदूल मंडल, सचिन गौड, मोहम्मद निशाद अहमद, संतोष राजभर, शंकर सिंग आणि संतोष तायडे अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 42 लाखांचे दागिने जप्त करण्यात आले. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

शहा यांचा दहिसर येथे सोन्याच्या दागिन्यांचा कारखाना आहे. त्यांच्याकडे लालबाबू शेख कामाला आहे. चार दिवसांपूर्वी तो 42 लाखांचे दागिने पॉलिश करण्यासाठी निघाला होता. त्या वेळी दहिसर पश्‍चिम येथे चौघांनी त्याच्या हातातील बॅग घेऊन पळ काढला. याप्रकरणी एमएचबी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून नऊ संशयितांना ताब्यात घेतले. त्यातील आरोपी शफीकउल्ला शहा यांच्याकडेच कामाला होता. लालबाबू दागिने पॉलिश करण्यासाठी घेऊन जाणार असल्याचे त्याला माहीत होते. त्यानुसार त्याने चोरीचा कट रचला. तोयदूलने 11 जणांच्या मदतीने ही चोरी केली. चौघांनी लालबाबूच्या हातातून बॅग ओढली आणि इतरांनी चोर-चोर असा कांगावा करून चौघांना पळून जाण्यास मदत केली. 

Web Title: Nine people arrested in the case of gold theft

टॅग्स