'ते' नऊ जण आले परदेशातून आणि मग त्याचं असं झालं की...

'ते' नऊ जण आले परदेशातून आणि मग त्याचं असं झालं की...

मुंबई:  परदेशातून आलेल्या प्रवाशांची विमानतळावर कोविड चाचणी नकारात्मक आल्यानंतरही त्यांना मुंबईतील हॉटेलमध्ये विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. मात्र चेंबूर मधील हॉटेलमध्ये राहण्यासाठी आलेले नऊ परदेशी प्रवासी बाहेर फिरत असल्याने त्यांच्यासह हॉटेल मालकावरही चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील दोन जण पुण्यातील पती पत्नीसह सहा जण आणि कल्याण येथील एकावर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील सर्व प्रवाशांना विलगीकरणाचा कालावधी शुक्रवारीच संपणार होता. मात्र सकाळी पालिकेचे पथक हॉटेलमध्ये गेले असताना ते न आढळल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्व 20 ते 23 तारखेदरम्यान परदेशातून विमानाने मुंबईत आले होते. त्यांना विलगीकरणासाठी चेंबूर येथील मानस रेसिडन्सी या हॉटेलमध्ये जागा उपलब्ध करुन दिली होती. महानगर पालिकेचे पथक या प्रवाशांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवार(ता.26) सकाळी पोहचले तेव्हा यातील एकही प्रवासी हॉटेलमध्ये नव्हता. याबाबत पालिकेच्या पथकाने हॉटेलमधील कर्मचाऱ्याला विचारणा केली असता त्यांनी विनंती केली म्हणून त्यांना बाहेर जाऊ दिले असे सांगण्यात आले. महानगर पालिकेच्या पथकाने या प्रकारची दखल घेऊन या नऊ प्रवाशांसह हॉटेलचे मालक प्रकाश भंडारी, चालक सिध्दार्थ नूलकर यांच्यासह कर्मचाऱ्यां विरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रवाशांना आता पालिकेच्या विलगीकरण केंद्रात पाठवले आहे.

मुंबई- कौशिक ठक्कर घाटकोपर (45)
मुंबई- शहाबाज खान ट्रॉम्बे (23)
कल्याण - प्रशांत पगवाड (40)
पुणे - रोहन गिरे (26)
पुणे-  तेजश्री रोहन गिरे , भोसरी (26),
पुणे- प्रतिक भोंडवे,भोसरी (26)
पुणे- रुचिका बांगर,कोंढवा (23)
पुणे- अक्षया आल्हाद ,मोशी (23)
पुणे - प्रतिक तळेकर (24)

(संपादन- पूजा विचारे)

Nine People break rule Quarantine traveling in Mumbai Crime filed Chembur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com