Mumbai : मध्य रेल्वेच्या व्हिस्टाडोम कोच सुसाट; ८.४१ कोटी रुपयांची कमाई! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nine vistadomes get 8 crore to central railway in six months mumbai

Mumbai : मध्य रेल्वेच्या व्हिस्टाडोम कोच सुसाट; ८.४१ कोटी रुपयांची कमाई!

मुंबई : मध्य रेल्वेवरील व्हिस्टा डोम डब्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. गेल्या सहा महिन्यात नऊ मेल- एक्सप्रेस गाड्यामधील विस्टाडोम कोचमधून ६६ हजार पर्यटकांनी प्रवास केला असून त्यामधून ८ कोटी ४१ लाख रुपयांचा महसूल मध्य रेल्वे प्रशासनाला मिळाला आहे.

मध्य रेल्वेचा मुंबई ते गोवा मार्गावरील दऱ्या, नद्या आणि धबधब्यांची चित्तथरारक दृश्ये असोत किंवा मुंबई - पुणे मार्गावरील पश्चिम घाटाची नयनरम्य दृश्ये असोत, काचेचे टॉप आणि रुंद खिडक्या असलेला व्हिस्टाडोम कोचला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेचा व्हिस्टाडोम कोच हिट ठरले आहेत. मध्य रेल्वेने नोव्हेंबर २०२२ ते एप्रिल २०२३ या सहा महिन्यांत मध्य रेल्वेच्या व्हिस्टाडोम डब्यांमधून सुमारे ६६ हजार प्रवाशांनी प्रवास केला असून याद्वारे तब्बल ८.४१ कोटी रुपये महसूल मिळाल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

या विस्टाडोम कोचला मिळणाऱ्या प्रचंड लोकप्रियतेमुळे हे डबे मुंबई - पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये २६ जून २०२१ पासून सुरू करण्यात आले आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन मुंबई-पुणे मार्गावरील आणखी दोन विस्टाडोम डबे डेक्कन क्वीनला १५ ऑगस्ट २०२१ पासून आणि प्रगती एक्स्प्रेसमध्ये २५ जुलै २०२२ पासून जोडण्यात आले. तसेच पुणे - सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्ये देखील एक विस्टाडोम कोच १० ऑगस्ट २०२२ पासून जोडण्यात आला आहे.

जनशताब्दी एक्स्प्रेसचा सुसाट -

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार,जनशताब्दी एक्स्प्रेसचा जोडण्यात आलेल्या विस्टाडोम कोच सर्वाधिक प्रतिसाद पर्यटकांनी दिली आहे. ८ हजार २५६ प्रवासीसंख्येसह सर्वात पुढे असून १.७१ कोटी महसूल मिळविला आहे. मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस म्हणजेच १५ हजार ५६४ प्रवासी आणि १. १८ कोटी महसूल मिळविला आहे. वर्ष २०१८ मध्ये मुंबई - मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये विस्टाडोम कोच पहिल्यांदा मध्य रेल्वेत सादर करण्यात आले. प्रवाशांच्या प्रचंड मागणीनंतर आतापर्यत ९ गाडयांना विस्टाडोम कोच जोडण्यात आलेला आहे.

विस्टाडोम डब्यांचे वैशिष्ट्ये -

व्हिस्टाडोम डब्यांमध्ये काचेच्या छताशिवाय रुंद खिडक्या, एलईडी दिवे, फिरता येण्याजोग्या सीट आणि पुशबॅक खुर्च्या, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लाइडिंग कंपार्टमेंट डोअर्स, दिव्यांगांसाठी रुंद बाजूचे सरकते दरवाजे, सिरेमिक टाइल फ्लोअरिंग असलेली टॉयलेट इत्यादी अनेक वैशिष्ट्यांसह आकर्षक व्ह्यूइंग गॅलरी आहे.

नोव्हेंबर २०२२ ते एप्रिल २०२३ कालावधीत चालवलेल्या ९ विस्टाडोम कोचची कामगिरी

एक्सप्रेस प्रवासी संख्या उत्पन्न

  • मुंबई - मडगाव जनशताब्दी ८२५६ १.७१ कोटी

  • शताब्दी एक्सप्रेस ६३३७ १.३५ कोटी

  • प्रगती एक्स्प्रेस ८७०० १.३१ कोटी

  • डेक्कन क्वीन १४,६७२ १.३५ कोटी

  • डेक्कन एक्स्प्रेस १५,५६४ १.१८ कोटी

  • तेजस एक्सप्रेस ६०५५ १.५० कोटी