बेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी समुपदेशकाची नियुक्ती

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 16 जानेवारी 2019

बेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयाने समुपदेशकाला नियुक्त केले आहे. ते माजी न्यायमूर्ती असतात. त्यांच्यापुढे बेस्ट प्रशासन आणि कर्मचारी संघटना आणि मुंबई महापालिका आपली बाजू मांडतील, त्यानुसार आता निर्णय घेण्यात येणार आहे.

मुंबई- बेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयाने समुपदेशकाला नियुक्त केले आहे. ते माजी न्यायमूर्ती असतात. त्यांच्यापुढे बेस्ट प्रशासन आणि कर्मचारी संघटना आणि मुंबई महापालिका आपली बाजू मांडतील, त्यानुसार आता निर्णय घेण्यात येणार आहे.

10 टक्के वेतनश्रेणीत वाढ झाली पाहिजे अशी पहिली मागणी बेस्ट प्रशासनाने समोर ठेवलेली आहे. ही मागणी मान्य करत फेब्रुवारीपासून देण्याचे ठरविले होते. पण, उच्च न्यायालयाने जानेवारीपासून देण्याचे सांगितले आहे. बेस्ट प्रशासनाचे बजेट महापालिकेच्या बजेटमध्ये विलीन करायचे. मात्र, महापालिकेचा विरोध आहे, अशा प्रकारच्या उर्वरित सर्व मागण्यांवर आता चर्चा करण्यात येणार आहे.

दरम्यान, बेस्ट संघटना संप मागे घ्यायला तयार आहे, मात्र इलेक्ट्रॉनिक बससाठी वेटलिस्ट आणू नये आणि वेतनवाढ पंधरा टक्के वेतनवाढ करावी हा मुद्दा संघटनांनी लावून धरला होता. यावर संघटनाना दबाव टाकून वाटाघाटी करु नका, मुद्देसूद चर्चा करावी असे आदेश न्यायालयाने संघटनांना दिले आहेत.

Web Title: ninth day after high court appoints mediator