निरव मोदींच्या मुंबईतील ऱ्हिदम हाऊसचा होणार लिलाव ? ईडीने सोडला ताबा | Nirav Modi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nirav Modi

नीरव मोदींच्या ऱ्हिदम हाऊसचा होणार लिलाव? ईडीनं सोडला ताबा

मुंबई : हिरे व्यापारी निरव मोदी (Nirav Modi) यांच्या कंपन्यांच्या मालकीच्या असलेल्या मुंबई फोर्ट (Mumbai Fort) येथील ऱ्हिदम हाऊस (Mumbai rhythm house) या हेरिटेज इमारतीचा लिलाव (Auction possibilities) होण्याची शक्यता आहे. यासाठी ईडीने (enforcement directorate) या इमारतीचा ताबा सोडला आहे. (Nirav modis mumbai rhythm house auction possibilities as enforcement directorate left possession)

हेही वाचा: BMC : केईएम रुग्णालयात लवकरच खासगी ओपीडी; वाचा सविस्तर

पंजाब नॅशनल बँकेच्या फसवणुकप्रकरणी ही कारवाई सुरु आहे. या इमारतीवर इडी ने टाच आणली होती. पण विशेष न्यायालयाच्या आदेशानुसार आता ईडीने या इमारतीचा ताबा सोडला आहे. त्यामुळे तिचा लिलाव करणे बँकांना शक्य होईल व त्यातून मोदीने थकवलेले पैसे वसूल केले जातील.

मोदींच्या फायरस्टार डायमंड इंटरनॅशनल ने ही इमारत 2017 मध्ये खरेदी केली होती. एनसीएलटी ने यापूर्वीच या मालमत्तांचा लिलाव करण्याचा आदेश दिला होता. मात्र मनी लाँडरिंगची चौकशी करणाऱ्या ईडीच्या ताब्यात ती मालमत्ता असल्याने त्यांचा लिलाव करता येत नव्हता. आता ईडी कडून अन्य मालमत्तांचा ताबाही सोडून दिला जाईल, त्यामुळे त्यांचा लिलाव करून पैसे वसूल करणे शक्य होईल. मोदी सध्या लंडनमध्ये असून त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Web Title: Nirav Modis Mumbai Rhythm House Auction Possibilities As Enforcement Directorate Left Possession

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..