Crime : निर्मल हाउसिंग प्रकरण आरोपी संचलकाच्या विरोधात फसवणुकीच्या अजून एका गुन्ह्याची नोंद

गृह निर्माण प्रकल्पात 54 सदनिका खरेदीदारांची फसवणूक केल्या प्रकरणी कंपनीच्या दोन्ही संचालकांना अटक
Nirmal housing case Another case of fraud registered against accused mumabi police crime
Nirmal housing case Another case of fraud registered against accused mumabi police crimeesakal

मुंबई : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने निर्मल लाइफस्टाइल लिमिटेडचे संचालक धर्मेश जैन आणि राजीव जैन यांना आणखी एका गृहनिर्माण प्रकरणात फसवणूकीच्या आरोपात अटक केली आहे.

गृह निर्माण प्रकल्पात 54 सदनिका खरेदीदारांची फसवणूक केल्या प्रकरणी कंपनीच्या दोन्ही संचालकांना अटक करण्यात आली आहे. मुलुंड पश्चिम येथील गृहनिर्माण प्रकल्पातील सदनिकाधारकाची आर्थिक फसवणूक करून आरोपीं संचालकांनी आजतागायत सदनिकाधारकाना सदनिका हस्तांतरित केल्या नाहीत.

अटकेचे दुसरे प्रकरण

आर्थिक गुन्हे शाखेने धर्मेश आणि राजीव यांना अटक केलेले हे दुसरे प्रकरण आहे. याआधी या दोघांना 27 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. गुरुवारी पहिल्या गुन्ह्यात मुंबईतील न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या प्रकरणात चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतले.

आता आर्थिक गुन्हे शाखा दोन्ही आरोपी संचालकांचीची एकूण तीन प्रकरणांत चौकशी करत आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पहिल्यांदा डिसेंबर 2021 मध्ये निर्मल लाइफेस्टाइल लिमिटेडचे संचालक धर्मेश जैन, राजीव जैन यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद केली होती.

54 सदनिकाधारकांची फसवणूक

नवीन नोंदवलेल्या गुन्ह्यात मुलुंड (पश्चिम) येथील एलबीएस मार्गावर असलेल्या 39 मजली ‘झिरकॉन’ गृहनिर्माण प्रकल्पात 54 सदनिका धारकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.या आरोपात दाखल केलेल्या तक्रारीवर हा गुन्हा आधारित आहे.

सदनिका वेळेवर न मिळाल्याने खरेदीदारांनी झिरकॉन फ्लॅट ओनर्स वेल्फेअर असोसिएशनची स्थापना केली. तसेच असोसिएशनच्या माध्यमातून पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी केलेल्या तपासात सदनिका खरेदीदारांकडून विकासकाने 80 कोटी 93 लाख रुपये स्वीकारल्याची माहिती उघड झाली.

पोलिसांनी या प्रकरणी केलेल्या तपासात, तसेच विकासकाकडून सादर करण्यात आलेल्या कागदपत्रानुसार, त्यातील 80 सदनिकाधारकांना पूर्ण रक्कम, तर 177 जणांना अंशतः रक्कम परत करण्यात आली आहे. तसेच 132 सदनिकाधारकांना प्रकल्पातून बाहेर पडायचे नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.सदनिकाधारकांकडून स्वीकारण्यात आलेल्या एकूण रकमेपैकी 39 कोटी रुपयांचा दावा अद्याप बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com