शरद पवारांनी पार्थ पवारांना फटकारल्यानंतर राणे बंधुंनी दिली 'ही' प्रतिक्रिया

पूजा विचारे
Thursday, 13 August 2020

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार यांना जाहिररित्या फटकारले. माजी खासदार निलेश राणे यांनी शरद पवार यांच्या निशाणा साधला आहे. तर नितेश राणे यांनी पार्थ पवारांची पाठराखण केली आहे.

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार यांना जाहिररित्या फटकारले.  पार्थ पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंह प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. त्यावर शरद पवार यांनी भाष्य करत माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नसल्याचं सांगितलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा अस्थवस्थता निर्माण झाल्याचं चित्र आहे. यावर आता वेगवेगळ्या राजकारणी नेत्यांची यावर प्रतिक्रिया येऊ लागल्यात. यावरुनच माजी खासदार निलेश राणे यांनी शरद पवार यांच्या निशाणा साधला आहे. तर नितेश राणे यांनी पार्थ पवारांची पाठराखण केली आहे.

ट्विट करत निलेश राणे म्हणाले की, स्वतःच्या नातवाला ज्या भाषेत पवार साहेबांनी फटकारले वाचून आणि ऐकून धक्का बसला. एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच बघितले. 

पवार साहेब हे जाहीर करा हा राग पार्थ ने राम मंदिरला समर्थन दिलं म्हणून होता की सुशांत प्रकरणात CBI चौकशीची मागणी केली म्हणून?, असा प्रश्नही निलेश राणेंनी उपस्थित केला आहे.

हेही वाचाः  डॉक्टरांसाठी खूशखबर...विद्यावेतन १० हजारांनी वाढले!

नितेश राणेंकडूनही पार्थ पवारांची पाठराखण

पार्थ पवारांना फटकारल्यानंतर भाजप आमदार नितेश राणेंनी त्यांची पाठराखण केली. आज परत सांगतो.. पार्थ.. लंबी रेस का घोडा है !!! थांबू नकोस मित्रा !!” असे ट्वीट नितेश राणेंनी केले आहे. 

शरद पवार काय म्हणाले 

पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी CBI द्वारे करण्याची मागणी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी म्हटलं की,  माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे. सीबीआय चौकशीबाबत बोलायचं, तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलिस आणि मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचं कारण नाही.

Nitesh Rane Nilesh Rane reaction Parth Pawar Ncp Sharad Pawar calls him Immature


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitesh Rane Nilesh Rane reaction Parth Pawar Ncp Sharad Pawar calls him Immature