ठाकरेंचे नातेवाईक वरूण सरदेसाई यांचे सचिन वाझेंशी आर्थिक संबंध- नितेश राणे

Nitesh-Rane
Nitesh-Rane

मुंबई: सध्या महाराष्ट्रात मनसुख हिरेन-सचिन वाझे प्रकरण गाजत असताना भाजप आमदार नितेश राणे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सचिन वाझेंवर गंभीर आरोप केले. सचिन वाझे यांनी IPLच्या सट्टेबाजांकडून तब्बल दीडशे कोटींची खंडणी मागितली असल्याचा आरोप त्यांनी केला. सचिन वाझे यांना अटक झाली असताना एनआयएने आता या प्रकरणाचीदेखील चौकशी करायला हवी अशी मागणी केली, अशी मागणीही राणे यांनी केली. तसेच, ठाकरे कुटुंबीयांचे नातेवाईक असलेल्या वरूण सरदेसाईंचे सचिन वाझेंसोबत आर्थिक संबंध असल्याचेही राणे म्हणाले. .

"देशात IPLचे सामने खेळवले जातात, त्यामागे नवोदित क्रिकेटपटूंना संधी मिळावी हा हेतु असतो. स्थानिक क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळावं यासाठी IPL स्पर्धा भरवली जाते. IPLच्या सामन्यांमध्ये सट्टा लावला जातो ही बाब उघड असून पोलिसांनी अशा लोकांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत पण सचिन वाझे स्वत: या सट्टेबाजांना फोन करायचे आणि त्यांच्याकडून खंडणीची मागणी करायचे. 'तुमचं लोकेशन आणि सगळी माहिती माझ्याकडे आहे. तुमच्यावर अड्ड्यावर जर छापा पडू द्यायचा नसेल तर मला दीडशे कोटी रुपये द्या', अशी धमकी वाझे यांनी सट्टेबाजांना दिली होती", असा खळबळजनक आरोप नितेश राणेंनी केला. यांनी केला आहे.

सट्टेबाजांच्या प्रकरणात सचिन वाझेंसोबत आणखी एकाचा नावाचा उल्लेख

"सचिन वाझेंनी सट्टेबाजांना खंडणीसाठी फोन केला की वाझेंना दुसऱ्या माणसाचा फोन येतो. सट्टेबाजांकडून जे पैसे मागितलेत त्यात आमचं काय? आम्हाला त्यातला किती हिस्सा?, अशी विचारणा या माणसाकडून केली जाते. हा माणूस इतर कोणीही नसून वरुण सरदेसाई आहे. वाझे आणि सरदेसाई यांच्यातील संभाषणाची चौकशी करण्यात यायला हवी. या संभाषणाचा सीडीआर काढण्यात यावा, त्यात काय-काय बोलणं झालं आहे याचीही माहिती घेतली जायला हवी", अशी मागणी त्यांनी केली.

"सरदेसाई कुणाचा नातेवाईक आहे आणि कुणाच्या आशीर्वादाने हे फोन केला जात होता हे सांगण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले. वाझेंना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या निमित्ताने सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. वाझे-वरुण सरदेसाईंची काय लिंक आहे त्याचाही तपास करण्यात यावा, सर्वच बाहेर येईल, असंही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com