'हिसाब तो होगा, इंटरेस्ट लगाके'; अर्णब अटकेच्या पार्श्वभूमीवर नितेश राणेंचे ट्विट

तुषार सोनवणे
Wednesday, 4 November 2020

भाजपनेते नितेश राणे यांनी नाव न घेता राज्य सरकारवर तोफ डागली आहे.

मुंबई -  रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी ताब्यात घेतले. गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, अर्णब यांच्या अटकेनंतर विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. भाजपनेते नितेश राणे यांनी नाव न घेता राज्य सरकारवर तोफ डागली आहे.

'एवढा गळा काढून रडायला अर्णब गोस्वामी भाजपचा कार्यकर्ता आहे का?'; अनिल परब यांचा घणाघात

वास्तूविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईक यांनी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये अर्णब यांचे नाव असल्याचा दावा त्यांच्या कुटूंबियांनी केला होता. परंतु अर्णबवर झालेली कारवाई पाहता राज्य सरकार सूड भावनेने काम करीत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. भाजपनेते नितेश राणे यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. ते आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, '' सत्ता आज है कल नही, आज तुम्हारी है कल हमारी होगी, बस इतना याद रखना, हिसाब तो होगा , इंटरेस्ट लगाके.

 अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

भाजपनेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अर्णब यांना झालेल्या अटकेची तुलना त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणिबाणीशी केली आहे.देवेद्र फडणवीस  यांनी म्हटले की, 'आणिबाणी 1977 मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम! आणिबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे.' 

Nitesh Ranes tweet in Arnab Goswami case
-------------------------------------------------------

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitesh Ranes tweet in Arnab Goswami case