नितीन गडकरी यांचे ‘संपर्क से समर्थन’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

मुंबई -  भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापाठोपाठ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी मुंबईत ‘संपर्क से समर्थन’ हे अभियान राबविले. या अभियानांतर्गत त्यांनी आज अभिनेता सलमान खानची त्याच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

या वेळी गडकरी यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या गेल्या चार वर्षांतील कामगिरीची माहिती दिली. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी वलयांकित व्यक्तींच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी अमित शहा यांनी उद्योगपती रतन टाटा, अभिनेत्री माधुरी दीक्षित यांची भेट घेतली होती. 

आज गडकरींनी वांद्रे येथील सलमानच्या घरी जाऊन सलामान तसेच त्याचे वडील सलीम खान यांची भेट घेतली. त्यानंतर गडकरींनी येस बॅंकेचे अध्यक्ष राणा कपूर यांची भेट घेतली.

Web Title: Nitin Gadkari meet Salman Khan