राणेंच्या कार्यक्रमात गडकरींना मुंडेंची आठवण; म्हणाले...

राणेंच्या कार्यक्रमात गडकरींना मुंडेंची आठवण; म्हणाले...

मुंबई : नारायण राणे आणि गोपिनाथ मुंडे हे माझे नेते असल्याचे मत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या झंझावात या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला गडकरी यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, विनोद तावडे, आशिष शेलार, सुनील तटकरे आदी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, झंझावात हा शब्द नारायण राणे यांना बरोबर शोभतो. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ते मुख्यमंत्री झाले हाच त्यांचा झंझावात आहे. नारायण राणे मंत्री असताना मी ही मंत्री होतो. मात्र राणे कॅबीनेटमध्ये नेहमीच इतरांपेक्षा वेगळं बोलायचे. राणेंचा आणि माझा स्वभाव स्टेट फॉरवर्ड आहे. राजकारणातील मैत्री ही त्या व्यक्तीशी नसते तर ती ज्या पदावर आहे त्यावर असते. मला राजकारणात मोठी-मोठी पद मिळाली असतील मात्र माझे दोन नेते आहेत ते म्हणजे नारायणराव राणे आणि गोपीनाथ मुंडे त्यांना विसरुन चालणार नाही.

गडकरी पुढे म्हणाले की, नारायण राणे यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नितांत प्रेम होतं आणि मी ज्यावेळी बाळासाहेब यांना भेटायचो त्यावेळी बाळासाहेब यांचेही राणे यांच्यावर खूप प्रेम होतं हे कळायचं. माणूस रणांगणावर पळून गेला की तो हरतो मात्र त्याच राणांगणावर हरला तरी तो संपत नाही आणि राणे यांनी कधीही शरणागती पत्करली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com