एनएमएमटी बसला लोकलची धडक ; तिघे जखमी 

NMMT bus hits local area; Three injured
NMMT bus hits local area; Three injured

नवी मुंबई : सानपाडा कारशेडमधून नेरूळच्या दिशेने निघालेल्या लोकलची जुईनगर रेल्वे क्रॉसिंगवर नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी) बसला धडक बसली. शनिवारी दुपारी घडलेल्या या अपघातात बसमधील दोन महिला आणि एक शाळकरी मुलगा जखमी झाला. लोकलचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

एनएमएमटीची वाशी ते बामणडोंगरी-उलवे नोड या मार्गावर धावणारी बस शनिवारी दुपारी 3च्या सुमारास जुईनगर रेल्वेस्थानकासमोरून नेरूळच्या दिशेने चालली होती. बसमध्ये 18 प्रवासी होते. याचवेळी रेल्वेच्या सानपाडा कारशेडमधून नेरूळच्या दिशेने निघालेली लोकल जुईनगर रेल्वे क्रॉसिंगवर येत होती. या वेळी बसचालक राहुल गायकर याने लोकल येण्याआधी रेल्वे क्रॉसिंग पार करण्याच्या प्रयत्नात बस पुढे नेली. मात्र, क्रॉसिंगवरच बसच्या मागील बाजूला लोकलची जोरदार धडक बसली.

या अपघातात बसमधील दोन महिला आणि एक शाळकरी मुलगा असे तीन प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच नेरूळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले आणि अपघातग्रस्त बस बाजूला हटवली. 

बसचालकाचा निष्काळजीपणा? 

हा अपघात बसचालकाच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी नेरूळ पोलिस अधिक तपास करत आहेत. संबंधित बसचालक एनएमएमटी उपक्रमातील रोजंदारीवरील कर्मचारी आहे.

महिनाभरापूर्वी तो उपक्रमात भरती झाला होता. या अपघाताची चौकशी करून दोषींवर उपक्रमाच्या माध्यमातून कारवाई करू, असे महापालिका परिवहन समितीचे सभापती रामचंद्र (आबा) दळवी यांनी सांगितले. त्यांनी डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com