कोरोनाबाधित जिल्ह्यात राहता? ...सीईटी परीक्षेसाठी मिळणार 'ही' संधी!

कोरोनाबाधित जिल्ह्यात राहता? ...सीईटी परीक्षेसाठी मिळणार 'ही' संधी!
कोरोनाबाधित जिल्ह्यात राहता? ...सीईटी परीक्षेसाठी मिळणार 'ही' संधी!

मुंबई : राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जुलै-ऑगस्ट महिन्यात एमएचटी-सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा अनेक जिल्ह्यांना कोरोनाने विळखा घातला असल्यामुळे या जिह्यांमध्ये परीक्षा केंद्र नको, अशी विनंती अनेक विद्यार्थी आणि पालकांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडे (सीईटी सेल) केली आहे. ही विनंती सीईटी सेलने मान्य केली असून विद्यार्थ्यांना परीक्षा अर्जात जिल्हा बदली करण्याची संधी दिली आहे. त्यानुसार 10 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना अर्जात परीक्षा केंद्र बदलता येणार आहे.

सीईटी परीक्षेचा अर्ज भरताना विद्यार्थांनी आपला जिल्हा निवडला, पण त्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या संख्येने मिळत असल्याने विद्यार्थांनी जिल्हा बदलून इतर जिल्ह्यात परीक्षा केंद्र देण्याची मागणी सीईटी सेलकडे केली आहे. त्यानुसार सीईटी सेलने विद्यार्थ्यांना जिल्हा बदलण्याची मुभा दिली आहे. त्यानुसार एमएचटी सीईटीच्या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना दुसरा जिल्हा निवडता येणार आहे. विद्यार्थ्यांना 10 जूनपर्यंत परीक्षा केंद्र बदलता येणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्यवस्था असेल तरच नवे केंद्र!
विद्यार्थांनी जिल्हा बदलला तरी संबंधित ठिकाणी परीक्षा केंद्राची व्यवस्था होत असेल तरच विद्यार्थांना आवश्यक जिल्ह्यातील परीक्षा केंद्र उपलब्ध होईल, असेही सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com