नवी मुंबईत गावबंदी 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 March 2020

 

नवी मुंबई : कोरोना रोखण्यासाठी नवी मुंबईतील गावठाण भागात वर्दळ थांबवण्यासाठी प्रवेश मार्गांवर बांबूचे अडथळे करण्यात आले आहेत. तसेच गावात विनाकारण फिरणाऱ्यांना "कडक' समज देण्यास सुरुवात केली आहे. 

हे वाचा : मुंबई - गोवा सीमा सील
कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी राज्यात संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. त्याला नवी मंबईतील गावठाण भागात हरताळ फासला जात आहे असे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे गावठाण भागातील ग्रामस्थ मंडळांसह तरुण मंडळांनी स्वतःहून निर्णय घेऊन अनावश्‍यक वर्दळ थांबवण्यासाठी गावातील मुख्य रस्त्यांवर बांबूचे अडथळे केले आहेत. 

हे वाचा : अजूनही जिवंत आहे माणुसकी

गावात कोणतेही वाहन येऊ दिले जात नाही. गावातून कोणतेही वाहन बाहेर जाऊ दिले जात नाही, अशी माहिती ऐरोली गावातील सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांनी दिली. अशाच प्रकारे तुर्भे ग्रामस्थांनीसुद्धा गावबंदी केली असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते शरद पाटील यांनी दिली. वाशी, जुहूगावातसुद्धा मुख्य रस्ते बंद करून पायी फिरणाऱ्यांनासुद्धा अटकाव केला जात असल्याचे मनोज म्हात्रे यांनी सांगितले. 

गावात मूळ ग्रामस्थ, परप्रांतीय आणि नोकरदारांची वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे. शासनाने संचारबंदी जाहीर केली आहे; मात्र रहिवाशी गांभीर्य समजून घेण्याच्या मानसिकतेत नसल्याने ग्रामस्थ मंडळाने रस्ते बंद करून वर्दळ कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. 
- मनोज म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते, जुहू गाव 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No entry in Navi mumbai

Tags
टॉपिकस
Topic Tags: