विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाऱ्यावर

विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाऱ्यावर
विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाऱ्यावर

मुंबई ः अग्निशमन दलात मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे महापालिकेच्या १०९६ पैकी ६८६ शाळांची अग्निसुरक्षा तपासणी (फायर ऑडिट) अद्याप झालेली नाही. त्यामुळे हे काम त्रयस्थ संस्थांना देण्याची मागणी होत आहे.

मुंबई महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये अग्निशमन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एबीसी (कोरडी रासायनिक भुकटी) प्रकारची  ३१०७ व सीओ- २ प्रकारची ४८० अशी एकूण ३५८७ उपकरणे २०१४-१५ मध्ये बसवण्यात आली. त्यानंतर २०१५-१६ मध्ये नवीन २००० अग्निशमन उपकरणे बसवण्यात आली. महापालिकेने २०१७-१८ मध्ये आणखी ७२ नवीन उपकरणे खरेदी केली आहेत. 

मुंबई महापालिका क्षेत्रात ४११ अनुदानित आणि ६८५ विनाअनुदानित शाळा आहेत. या शाळांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शाळांची संख्या जास्त असून, अग्निशमन दलाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे अग्निसुरक्षा तपासणीचे काम रखडल्याचे समोर आले आहे.

महापालिका शाळांच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटचा प्रश्‍न उपस्थित करणाऱ्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनीच फायर ऑडिट करण्यासाठी अग्निशमन दलात मनुष्यबळाचा तुटवडा असल्याची गंभीर बाब उजेडात आणली. शाळांच्या अग्निसुरक्षा तपासणीसाठी त्रयस्थ संस्थेची नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com