पाच दिवसांचा आठवडा जवळपास नाहीच

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

मुंबई - मुख्यमंत्री, मुख्य सचिवांसह सर्व सरकारी कर्मचारी यांना पाच दिवसांचा आठवडा व्हावा, असे वाटत आहे. तरीही सध्याचे राजकीय वातावरण पाहता याबाबत कोणताही निर्णय होणार नाही, असे संकेत आहे.

जर झालाच तर पाच दिवसांचा आठवडा पुढील वर्षी होईल, असा तर्क लढवला जात आहे. आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत राजपत्रित अधिकारी महासंघ यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीपूर्वी संघटनेच्या वतीने आपल्या मागण्यांसाठी सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यात आला होता. मात्र, आजच्या बैठकीत काहीच पदरात पडले नसल्याचे समजते. 
 
पाच दिवसांचा आठवडा ही सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. ही मागणी सरकार पूर्ण करू शकते. मात्र, सध्या सरकारला कोणतीही टीका होईल, असा निर्णय करायचा नाही. पाच दिवसांचा आठवडा केला, तर अधिकारी-कर्मचारीधार्जिणे हे सरकार आहे. जनतेची कामे होत नाहीत. असे असतानाही पुन्हा पाच दिवसांचा आठवडा केला अशी टीका होईल, असे सांगितले जाते. मात्र, पुढील वर्षी सरकार पाच दिवसांचा आठवडा करण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी तीव्र झाल्यावर सरकार पाच दिवसांचा आठवडा करेल, असे सांगितले जाते. 

Web Title: No Five day week in Maharashtra