तहसिल कार्यालयात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे मृत्यूचे कारण अजूनही अनिश्चित

मुरलीधर दळवी
शुक्रवार, 11 मे 2018

मुरबाड (ठाणे) : 10 मे 2017 रोजी मुरबाड तहसिल कार्यालयाच्या इमारती वरून उडी मारून आत्महत्या केलेले शेतकरी अशोक शंकर देसले यांच्या मृत्यूला एक वर्ष उलटून गेले तरी सुद्धा ही आत्महत्या आहे की हत्त्या याचा तपास लावण्यात पोलिसांना यश येत नसल्याने देसले कुटुंबीयांनी 28 मे पासून मुरबाड तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

मुरबाड तालुक्यातील शेलगांव येथील शेतकरी शंकर देसले यांच्या नावावरील जमीन, महसुल कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीर रित्या त्यांच्या भावाच्या नावावर केल्या प्रकरणी, शंकर देसले यांचा मुलगा अशोक यांनी, महसुल कर्मचाऱ्यांनी केलेली चुक दुरुस्त करण्यासाठी मुरबाड तहसिल कार्यालयात अर्ज केला होता. 

याबाबत तलाठी, मंडळ अधिकारी यांनी दुरूस्तीचा अहवाल तहसिलदार यांना सादर केला होता . परंतू तत्कालीन तहसिलदार सर्जेराव म्हस्के पाटील यांनी अशोक देसले यांना अनेक हेलपाटे मारायला लावले. या त्रासाला कंटाळून देसले यांनी 10 मे 2017 रोजी तहसिल कार्यालयाच्या इमारती वरून उडी मारून आत्महत्या केली होती.

परंतु, त्यांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी आत्महत्या केली नाही तर तहसिलदार सर्जेराव म्हस्के पाटील यांनी  त्यांचा खुन केला आहे असा आरोप केला होता. या प्रकरणी मानवी हक्क आयोगाकडेही तक्रार करण्यात आली होती. परंतु कोणीही त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

अशोक देसले यांच्या मृत्यू नंतर काही दिवसातच त्यांच्या वडिलांचची जमीन पुन्हा त्यांच्या  नावावर करण्यात आली आहे.

Web Title: no reason behind farmer s suicide

टॅग्स