महिला डब्यावर बाटलीफेक

महिला डब्यावर बाटलीफेक

मुंबई - लोकलच्या महिला डब्यावर बीयरची बाटली भिरकावल्याने तीन प्रवासी महिला जखमी झाल्या. शुक्रवारी (ता. २१) रात्री कळवा-मुंब्रा स्थानकांदरम्यान हा प्रकार घडला. रुळांलगतच्या झोपडपट्टीनजीक असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे रात्री प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

शुक्रवारी (ता. २१) रात्री ९.३० वाजता डोंबिवली लोकलवर ठाणे-कळवा खाडीपुलाजवळ महिलांच्या डब्यावर अज्ञातांनी बीयरची रिकामी बाटली फेकली. त्यामुळे दरवाजात उभ्या असलेल्या आशा विनोद पाटील, सुष्मिता गावकर आणि अनघा अर्दळकर जखमी झाल्या. कळवा स्थानकात उतरल्यानंतर आशा आणि सुष्मिता यांच्यावर कळवा रुग्णालयात उपचार करण्यात आले, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. 

दरम्यान, शनिवारी (ता. २२) सकाळी ११.१४ वाजता अर्दळकर यांनी या घटनेबाबत ट्विट केले. अचानक महिला डब्यावर कोणीतरी दारूची बाटली फेकली. या मार्गावर असे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे रात्री उशिरा या मार्गावरून प्रवास करणे महिलांसाठी असुरक्षित आहे. घटना घडली त्या वेळी महिला डब्यात कोणीही पोलिस नव्हता, असेही त्यांनी म्हटले आहे.

कळवा येथे रेल्वे रुळालगत झोपडपट्टी असल्याने तिथे सीसी टीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी केली होती; मात्र अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही. रेल्वे प्रशासन संरक्षक भिंती बांधू शकत नाही, सुरक्षा यंत्रणाही अपुरी आहे. 
- वंदना गायकवाड, अध्यक्ष, महाराष्ट्र रेल्वे महिला प्रवासी महासंघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com