विरोधीपक्ष नेत्याची निवड लांबणीवर, देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का..

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 December 2019

काल ज्या प्रकारे विधानसभेत गदारोळ पाहायला मिळाला, त्याचप्रकारचा गदारोळ आज ( ता 01, डिसेंबर ) पुन्हा विधानसभेत पाहायला मिळू शकतो. त्याला कारणही तसंच आहे. आज ( रविवारी )  विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. अध्यक्षांच्या निवडणुकीनंतर राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवली जाईल. यानंतर अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव घेण्यात येईल. यानंतर विरोधी पक्ष नेत्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात येणार होती.

काल ज्या प्रकारे विधानसभेत गदारोळ पाहायला मिळाला, त्याचप्रकारचा गदारोळ आज ( ता 01, डिसेंबर ) पुन्हा विधानसभेत पाहायला मिळू शकतो. त्याला कारणही तसंच आहे. आज ( रविवारी )  विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. अध्यक्षांच्या निवडणुकीनंतर राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवली जाईल. यानंतर अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव घेण्यात येईल. यानंतर विरोधी पक्ष नेत्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात येणार होती. मात्र आज विरोधी पक्षनेत्याची निवड कामकाजातून वगळण्यात आलीये.  एकूणच देवेंद्र फडणवीसांना विरोधी पक्षनेतेपदापासून दूर ठेवण्याची रणनीती आता महाविकास आघाडीकडून  आखली गेल्याचं पाहायला मिळतेय .   

मोठी बातमी पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली, या मंत्र्यांची लागणार वर्णी..

 

No photo description available.

 

येत्या 16 डिसेंबर पासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन घेण्यात येणार आहे. या अधिवेशनातच आता विरोधीपक्ष नेता निवडला जाणार आहे. त्यानंतरच देवेद्र फडणवीस यांना विरोधीपक्ष नेतेपदाचे अधिकार मिळताना पाहायला मिळतील. आणि त्यांना विरोधीपक्ष नेत्याचं निवासस्थान देखील मिळू शकणार आहे. 

हे देखील वाचा 'तो अवयव शरीरापासून वेगळा करूनच शिक्षा जाहीर केली पाहिजे' - सुबोध भावे

दरम्यान, काल (ता 30 ) संध्याकाळी विधानभवनात महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीसंदर्भात रणनीती ठरवण्यात आली. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्याची महाराष्ट्र विकास आघाडीची रणनीती असल्याचं बोललं जातंय. या बैठकीला जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात हेही उपस्थित होते.

WebTitle : no selection of opposition leader in tomorrows vidhansabha agenda 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no selection of opposition leader in tomorrows vidhansabha agenda