esakal | नाशिकमध्ये एकही खड्डा नाही, हे रॉकेट सायन्स नाही - अमित ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

नाशिकमध्ये एकही खड्डा नाही, हे रॉकेट सायन्स नाही - अमित ठाकरे

नाशिकमध्ये एकही खड्डा नाही, हे रॉकेट सायन्स नाही - अमित ठाकरे

sakal_logo
By
दीनानाथ परब

डोंबिवली- मनसेचे (mns) युवा नेते आणि राज ठाकरे (raj thackeray) यांचे सुपूत्र अमित ठाकरे (amit thackeray) आज कल्याण-डोंबिवलीच्या (kalyan-dombivali) दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरे यांनी सर्वसामान्यांप्रमाणे दादरहून-डोंबिवलीपर्यंतचा प्रवास लोकलने केला. खड्डयांच्या प्रश्नावरुन अमित ठाकरे यांनी सत्ताधारी शिवसेनेविरोधात रान उठवलं आहे. "खड्ड्यांमुळे आज रस्तेमार्गाने कल्याण-डोंबिलवीत पोहोचायला दोन ते अडीच तास लागतात. लोकंच निवडणुकीच्या वेळी आता बोलतील. लोक बघतायत. प्रवास करताना दररोज त्रास सहन करतायत. एका पक्षाच्या हातात २५ वर्ष सत्ता दिली. पण त्यांना चांगले रस्तेपण बांधता आले नाहीत. हे लोकांना कळतय. नाशिकचे रस्ते तुम्ही आताही जाऊन बघू शकता" असे अमित ठाकरे म्हणाले.

"नाशिकचे पत्रकारच सांगतात तिथे एकही खड्डा नाही. नाशिकमध्ये एकही खड्डा नाही. हे रॉकेट सायन्स नाही. पाच वर्षात आम्ही चांगले रस्ते बांधून दाखवले. तुम्ही २५ वर्षात चांगले रस्ते देऊ शकत नाही का?" असा सवाल अमित ठाकरेंनी विचारला.

हेही वाचा: नांदेड पोटनिवडणूक: सुभाष साबणे शिवबंधन मोडून भाजपाची उमेदवारी घेणार?

"कंत्राटदारांशी लागेबंधे असल्यामुळे चांगले रस्ते जनतेला मिळत नाहीत. नाशिकमध्ये राजसाहेबांनी स्वत: लक्ष घातलं. नाशिकला चांगले रस्ते, बागा, पाणी मिळाले पाहिजे. ही त्यांची इच्छाशक्ती होती. पुढच्या ४० वर्षासाठी नाशिकला पाण्याच प्रश्न मिटला आहे" असे अमित ठाकरे म्हणाले.

हेही वाचा: परमबीर सिंग रशियामध्ये आहेत का?

ठेकेदारावर कारवाई केली पाहिजे असं आता बोललं जातय. त्या प्रश्नावर अमित ठाकरे म्हणाले की, "ठेकेदाराने तुम्हाला न सांगता रस्ते बांधले का? आपण काय बोलतोय, कारवाई केली जाईल हे तुमच्यासाठी सांगितल जातय. तीन दिवस हे सर्व चालणार आणि नंतर लोक विसरुन जाणार" असे अमित ठाकरे म्हणाले.

loading image
go to top