'नवी मुंबईत पुढील पन्नास वर्षे पाणीकपात होणार नाही' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

ऐरोली - ""महाराष्ट्रातील व देशातील इतर शहरांना पाणीप्रश्न भेडसावत असताना नवी मुंबईचे पाण्याचे नियोजन अशा पद्धतीने केलेले आहे, की पुढील पन्नास वर्षे शहरात पाणीकपात करावी लागणार नाही आणि तेही कोणत्याही प्रकारची घरपट्टी, पाणीपट्टी न वाढवता'', असे प्रतिपादन आमदार संदीप नाईक यांनी रविवारी (ता. 2) घणसोली येथे केले. नगरसेविका सीमा गायकवाड यांच्या प्रभाग क्र. 31 मधील मलनिःसारण वहिनी टाकणे, गटार व पदपथ तयार करणे या नागरी कामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

देशातील कोणत्याही पालिकेपेक्षा नवी मुंबई पालिका नागरिकांना दर्जेदार सोई-सुविधा पुरवण्यात आघाडीवर असून माजी मंत्री गणेश नाईक यांच्या दूरदृष्टीचा हा परिणाम असल्याचे ते म्हणाले. 

घणसोली हा नवी मुंबईतील सर्वात कमी विकसित असलेला नोड आहे. आम्ही विकासाचे नियोजन करताना एकात्मिक नियोजन करतो. त्यामुळे रस्ते, गटार, मलनिःसारण वाहिन्या, विद्युतवाहिन्या, पदपथ या सर्व गोष्टींचा विचार करून नियोजन केल्यामुळे रस्ते किंवा गटारे पुन्हा पुन्हा खोदावी लागणार नाहीत. 

येत्या काळात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम आणि अकादमीची या भागात आपण उभारणी करू; त्याचप्रमाणे लोककला केंद्र व जेट्टीची कामे नियमानुसार विकसित करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले. 

या प्रसंगी महापौर जयवंत सुतार, नगरसेवक घनश्‍याम मढवी, सीमा गायकवाड, इतर मान्यवर व प्रभागातील नागरीक उपस्थित होते .

Web Title: No water cut in the next fifty years in Navi Mumbai