किर्लोस्करांची लेक होणार टाटांची सून

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 15 मे 2019

बंगळूरमधील किर्लोस्कर समूहातील विक्रम यांची कन्या मानसी आणि टाटा ट्रेंटचे चेअरमन तसेच टाटा इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक नोएल टाटा यांचे चिरंजीव नेविल टाटा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.

मुंबई : अंबानी आणि पिरामल उद्योग समूहांनी नाते संबंध जुळवल्यानंतर आणखी दोन बडे उद्योग समूहांचे वैवाहिक नातेसंबंध जुळणार आहेत. प्रसिद्ध किर्लोस्कर उद्योग समूहातील विक्रम यांची कन्या मानसी आणि टाटा ट्रेंटचे चेअरमन तसेच टाटा इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक नोएल टाटा यांचे चिरंजीव नेविल टाटा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.

नुकताच दोघांचा साखरपुडा मुंबईत पार पडला. नेविल यांच्याकडे ट्रेंट ब्रॅंडच्या फूड सेगमेंटची जबाबदारी आहे. बंगळूरस्थित विक्रम किर्लोस्कर हे किर्लोस्कर टोयाटा मोटर्सचे प्रमुख आहेत. काही महिन्यांपूर्वी मुकेश अंबानी यांनी कन्या इशा अंबानी आणि अजय पिरामल यांचे पुत्र आनंद पिरामल यांचा विवाह झाला होता.

Web Title: Noel Tatas son Neville gets engaged to Manasi Kirloskar in Mumbai