ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांची "ट्‌विटर' मोहीम 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

आकडेवारी तक्रारी गुन्हे दाखल 
मुंबई - 1136 27 
ठाणे - 256 128 
पुणे - 567 08 

मुंबई - ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने ट्‌विटरवरून मोहीम सुरू केली आहे. यामुळे नागरिक थेट तक्रारी दाखल करू शकतात. राज्यभर ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात दिली. 

सार्वजनिक उत्सवाच्या काळात होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांना ध्वनिमापन यंत्रे पुरवली होती. त्यानुसार ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे. न्यायाधीश अभय ओक यांच्या खंडपीठापुढे यासंबंधीच्या जनहित याचिकेवर सुनावणी झाली. राज्यातून आतापर्यंत दोन हजार 433 तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी 683 तक्रारींमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. 

नागरिकांना तक्रार दाखल करणे सोईचे व्हावे, यासाठी मुंबई आणि ठाणे पोलिसांनी ट्‌विटरवर मोहीम सुरू केली असून, मुंबईत याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.  पोलिस येताना दिसल्यास ध्वनिक्षेपक बंद केला जातो. त्यामुळे पुरावा उपलब्ध होत नाही. यावर पोलिसांनी साध्या वेषात कारवाई करावी, असे न्यायालयाने सुचवले. 

Web Title: Noise pollution to prevent the police "Twitter" campaign