टोल कर्मचाऱ्यांवर  अदखलपात्र गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

ठाणे - आनंदनगर टोल नाक्‍यावर पिवळ्या पट्ट्याबाहेर वाहने गेली असतानाही टोल वसुली सुरू असल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या गोविंद हुरणेकर यांना टोल नाक्‍यावरील कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की आणि शिविगाळ केल्याप्रकरणी रविवारी मुलुंड येथील नवघर पोलिस ठाण्यात टोल कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला. 

भांडुप येथील गोविंद हुरणेकर हे शुक्रवारी भांडुप येथून ठाण्याच्या दिशेने दुचाकीने येत होते. दरम्यान, आनंदनगर टोलनाक्‍यावर वाहनांच्या मोठाल्या रांगा लागल्या होत्या. वाहने टोल केंद्रापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या पिवळ्या रेषेबाहेर गेल्याने गोविंद यांनी टोल कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे वाहने सोडण्यास सांगितले. या वेळी काही टोल कर्मचाऱ्यांनी त्यांना शिविगाळ आणि धक्काबुक्की केली, अशी तक्रार त्यांनी मुलुंड येथील नवघर पोलिस ठाण्यात केली आहे. या प्रकरणानंतर भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष ऋषिकेश आंग्रे यांनी कार्यकर्त्यांसह रविवारी टोलनाक्‍यावरील गाड्या टोल न भरता सोडायला लावल्या. 

Web Title: Non-traceable offense on toll employees

टॅग्स