30 हजार बकरे, पाच लाख कोंबड्याचा आज फडशा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत तब्बल 30 हजार बकरे आणि पाच ते सहा लाख कोंबड्यांना फोडणी मिळणार आहे. मासळी आणि बकऱ्यांचा तुटवडा असल्याने यंदाचा मांसाहार महागण्याची शक्‍यता आहे. 

मुंबईत यंदा बकऱ्यांचा तुटवडा आहे. मुंबईच्या देवनार कत्तलखान्यातून बकरे परराज्यात विक्रीसाठी जात असल्याने सध्या किलोमागे मटणाचा दर 540 ते 560 रुपयांवर पोहचला आहे. थर्टीफर्स्टनिमित्त मटणाची मागणी वाढणार असल्याने सुमारे 30 हजार बकऱ्यांची विक्री होईल, असा अंदाज विक्रेते लियाकत अली यांनी व्यक्त केला. त्यामुळे मटणाचा दर 20 ते 25 रुपयांनी वाढू शकतो, असेही त्यांनी सांगितले. 

मुंबईत दिवसाला 15 ते 20 हजार बकऱ्यांची कत्तल होते, तर आठवड्याला 60 हजार बकरे फस्त केले जातात; मात्र, थर्टीफर्स्टनिमित्त दिवसात 30 हजार बकऱ्यांचा फडशा पाडला जातो. 

कोंबड्यांच्या दरात फारसा फरक पडलेला नाही. रविवारी मुंबईत चार ते पाच लाख कोंबड्याची विक्री होते, तर थर्टीफर्स्टनिमित्त दिवसात एक-दीड लाख कोंबड्यांची जादा विक्री होईल, असा अंदाज विक्रेत्यांनी वर्तवला. बकरे आणि कोंबड्या विक्रेत्यांची जय्यत तयारी सुरू असताना मासळी बाजारात मात्र दुष्काळ पडला आहे. समुद्रात मासेच मिळत नसल्यामुळे आवक कमी झाली आहे. मासळीच्या तुटवड्यामुळे 15 दिवसांत दर दुपटीने वाढले आहेत, असे विक्रेत्यांनी सांगितले. 

दर (रुपये प्रति किलो) 
मासा : पूर्वी : सध्या 
पापलेट : 650 : 1000 
सुरमई : 450 : 850 ते 900

Web Title: Non veg is on demand for new year