मतदान न करणारे ‘इडियट’: जावेद अख्तर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

नागरिक म्हणून आपणही मतदानाचे कर्तव्य बजावले पाहिजे

मुंबई : जगात लोकशाही असलेली राष्ट्रे अत्यंत कमी आहेत. त्या राष्ट्रांमध्ये आपला भारत एक असल्याचा अभिमान वाटतो. त्यामुळे मतदान करणे आपले कर्तव्य आहे. जे लोक मतदान करत नाहीत, त्यांना ग्रीक भाषेत ‘इडियट’ म्हटले जाते, अशा शब्दांत ज्येष्ठ गीतकार व संवाद लेखक जावेद अख्तर यांनी मतदानासाठी बाहेर न पडणाऱ्या मतदारांना सोमवारी सुनावले. 
अख्तर अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासह मतदानासाठी आले होते. त्या वेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

भारतात लोकशाही आहे. बहुतेक देशांत लष्कराच्या हातात सत्ता आहे. जसा आपण सरकारला चांगल्या पद्धतीने काम करण्याचा सल्ला देतो, त्याप्रमाणे नागरिक म्हणून आपणही मतदानाचे कर्तव्य बजावले पाहिजे, असे अख्तर यांचे म्हणणे होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Non-voting 'Idiot': Javed Akhtar