किरकोळ कारणावरून तरुणाची हत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

सिगारेटचा धूर तोंडावर सोडल्याच्या वादातून तरुणाची हत्या झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 23) रात्री भांडुप परिसरात घडली. रामजी मोती राजभर (वय 26) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मुंबई : सिगारेटचा धूर तोंडावर सोडल्याच्या वादातून तरुणाची हत्या झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 23) रात्री भांडुप परिसरात घडली. रामजी मोती राजभर (वय 26) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. हत्येनंतर पळून गेलेल्या अल्पवयीन मुलाला भांडुप पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची रवानगी डोंगरीच्या बालसुधारगृहात करण्यात आली. 

रामजी हा भांडुपच्या चाफ्याचा पाडा परिसरात राहत होता. शुक्रवारी रात्री रामजी हा तुषार बिअर बारजवळील पान टपरीजवळ उभा होता. तेव्हा एक मुलगा तेथे सिगारेट ओढत उभा होता. त्याने सिगारेटचा धूर रामजीच्या तोंडावर सोडला. धूर तोंडावर सोडल्याने झालेल्या वादाचे रूपांतर बाचाबाचीत झाले. रागाच्या भरात अल्पवयीन मुलाने केलेल्या चाकूहल्ल्यात रामजी गंभीर जखमी झाला. उपचाराकरता रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्‍टरांनी रामजीला मृत घोषित केले.

रामजीच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून भांडुप पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हत्येनंतर पळून गेलेल्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्याची रवानगी बालगृहात करण्यात आली. रामजीच्या हत्येमुळे टेंभीपाडा परिसरात घबराट पसरली होती. 

Web Title: normal reasons youth murdered by someone