ईशान्य मुंबईत बाहेरचे उमेदवार लादल्याने कॉंग्रेसमध्ये नाराजी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

मुंबई - ईशान्य मुंबईतील अनेक मतदारसंघात कॉंग्रेसने अनेक उमेदवार लादल्याने येथील कॉंग्रेसच्या निष्ठावंतांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. या नाराजीचा फायदा शिवसेना आणि भाजपला मिळण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

मुंबई - ईशान्य मुंबईतील अनेक मतदारसंघात कॉंग्रेसने अनेक उमेदवार लादल्याने येथील कॉंग्रेसच्या निष्ठावंतांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. या नाराजीचा फायदा शिवसेना आणि भाजपला मिळण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

भांडुपमधील प्रभाग क्रमांक 103 मधून माजी महापौर आर. आर. सिंग यांचे चिरंजीव डॉ. रामचरित्र सिंह यांना पुन्हा कॉंग्रेसने उमेदवारी दिली आहे. गेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. यावेळी त्यांना पुन्हा संधी दिली आहे. प्रभाग क्रमांक 132 मध्ये कॉंग्रेसचे पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांना गारोडियानगरमधून उमेदवारी दिली आहे. छेडा हे तेथील स्थानिक नाहीत. प्रभाग क्रमांक 133 मधून कॉंग्रेसने ब्रिजमोहन शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. तेही तेथील स्थानिक नाहीत. त्यामुळे येथे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. प्रभाग क्रमांक 103 मधून कॉंग्रेसचे माजी नगरसेवक कमलाकर पाटील यांच्या पत्नी प्रमिला पाटील यांना उमेदवारी दिली आहे. कॉंग्रेसचे परशुराम मिरेकर हे मुलुंडमधून 1992 आणि 1997 मध्ये निवडून आले होते. त्यांच्या सून माधवी मिरेकर यांना उमेदवारी मिळाली आहे. 1992 मध्ये कॉंग्रेसचे बी. के तिवारी नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांचा पीए सचिन पवार यांच्या पत्नी साक्षी पवार यांना घाटकोपर पूर्व येथील प्रभाग क्रमांक 125 मधून भाजपने उमेदवारी दिली आहे. घाटकोपर पूर्वमधील प्रभाग क्रमांक 131 मध्ये भाजपचे भालचंद्र शिरसाट, शिवसेनेचे मंगल भानुशाली आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राखी जाधव यांच्यात लढत होईल. ईशान्य मुंबईत उमेदवारीवरून कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: north-east Mumbai congress