उत्तर भारतीय मतदार निघाला गावाला! 

श्‍वेता चव्हाण
रविवार, 14 एप्रिल 2019

उत्तर भारतात जाणारे प्रवासी 
तारीख : आरक्षण : रद्द आरक्षण 
23 मार्च : 1,75,397 : 29,707 
24 मार्च : 98,844 : 17,404 
25 मार्च : 1,90,520 : 31,814 
26 मार्च : 1,77,923 : 28,819 
27 मार्च : 1,70,362 : 27,983 
28 मार्च : 1,68,459 : 27,346 
29 मार्च : 1,66,459 : 26,778

मुंबई : भाजप आणि काँग्रेसचा हक्काचा उत्तर भारतीय मतदार ऐन निवडणुकीच्या काळात गावाकडे निघाला आहे. मुंबईत 29 एप्रिलला मतदान होणार आहे. 23 ते 29 मार्च या कालावधीत उत्तर भारतात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची तब्बल नऊ लाख 58 हजार तिकिटे आरक्षित झाली आहेत. यातील निम्मे जरी मतदार गृहीत धरले, तरी याचा फटका भाजप आणि काँग्रेसला बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

निवडणूककाळात गावी निघालेले उत्तर भारतीय प्रामुख्याने मुंबई आणि नजीकच्या जिल्ह्यातील आहेत. हा कॉंग्रेसचा पारंपरिक मतदार होता; मात्र मागील लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत तो भाजपकडे वळला. आता त्यातील अनेक मतदार कॉंग्रेसकडे वळण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे; मात्र लाखो उत्तर भारतीय ऐन निवडणुकीच्या काळात गावी निघाल्याने त्याचा फटका कॉंग्रेससह भाजपला बसण्याची शक्‍यता आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात 11 लाखांहून अधिक तिकिटे आरक्षित झाली होती. त्यातील सुमारे दीड लाख तिकिटे आतापर्यंत रद्द झाली आहेत. मुंबईहून दिल्ली, पंजाबसह हिंदी भाषक राज्यांत जाणाऱ्या 97 रेल्वेगाड्या आहेत. तसेच, परराज्यांतून मुंबईमार्गे जाणाऱ्या गाड्यांची संख्याही अधिक आहे. नियमित गाड्यांसह उन्हाळी विशेष गाड्यांची तिकिटे आरक्षित झाली आहेत. 

उत्तर भारतात जाणारे प्रवासी 
तारीख : आरक्षण : रद्द आरक्षण 
23 मार्च : 1,75,397 : 29,707 
24 मार्च : 98,844 : 17,404 
25 मार्च : 1,90,520 : 31,814 
26 मार्च : 1,77,923 : 28,819 
27 मार्च : 1,70,362 : 27,983 
28 मार्च : 1,68,459 : 27,346 
29 मार्च : 1,66,459 : 26,778

Web Title: North Indian voters go to villages Loksabha election