महाकाली गुंफाची एक इंचही जागा बिल्डरला विकू देणार नाही; प्रविण दरेकर यांचा इशारा

महाकाली गुंफाची एक इंचही जागा बिल्डरला विकू देणार नाही; प्रविण दरेकर यांचा इशारा

मुंबई  ः महाकाली गुंफांची एक इंचही जागा बेकायदेशीरपणे बिल्डरला विकण्याचा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही व असा प्रयत्न झाला तर त्याची किंमत ठाकरे सरकारला मोजावी लागेल असा इशारा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज येथे दिला. 

अंधेरीच्या महाकाली गुंफांशेजारच्या रस्त्याचा टीडीआर बिल्डरला देण्याची तयारी राज्य सरकारने व महापालिकेने केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी नुकताच केला आहे. या गुंफांच्या परिसरात आज सोमैय्या व दरेकर यांनी भाजप कार्यकर्त्यांसमावेत जाऊन सरकारचा निषेध केला. या दोघा नेत्यांनी या जागेची पहाणी केली तसेच स्थानिक नागरिकांशी चर्चा करून वस्तुस्थिती समजावून घेतली. 

स्थानिक नागरिकांच्या विकासकामांकडे लक्ष देण्यास सरकारला वेळ नाही. गुंफांच्या टीडीआरमार्फत बिल्डरच्या घशात दोनशे कोटी रुपये कसे जातील याकडे सरकारचे लक्ष आहे. ठाकरे सरकार मुंबई विकायला निघाले आहे. झोपड्यांमध्ये, चाळीत राहणाऱ्या गरीबांना घरे मिळण्यात अडचणी येत आहेत, त्यांचा पुनर्विकास रखडला आहे. पण ठाकरे सरकारला त्यांची काळजी नसून त्यांना सत्तेसाठी बिल्डरपुढे लोटांगण घालायचे आहे, अशी टीकाही दरेकर यांनी यावेळी केली. 
 
सरकार सत्तेत आल्यापासून मराठी अस्मिता विसरली आहे, सरकारच्या संवेदना मेल्या आहेत. मात्र भाजप नेहमी जनतेच्या पाठीशी आहे, त्याचमुळे येथील नागरिकांवर अन्याय होत असताना आम्ही येथे आलो. मुंबईच्या इंच इंच जागेच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ, पण मुंबईची जागा कोणालाही बेकायदेशीररित्या विकू देणार नाही, असेही दरेकर यांनी ठामपणे सांगितले.

Not even an inch of the Mahakali cave will be sold to the builder Pravin Darekars warning

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com