हा संप एसटीचा नाही - रावते 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

मुंबई - कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप हा एसटीचा नाही. कल्पना न देताच कर्मचारी गैरहजर राहिले आहेत. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल; पण वेतनवाढ मान्य नसल्यास त्यांनी औद्योगिक न्यायालयात जायला हवे होते, असे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. 

एसटी कामगारांनी अचानक केलेल्या अघोषित संपामुळे महामंडळाचे धाबे दणाणले आहे. एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते संपाबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले, ""हा एसटीचा संप नाही. कल्पना न देताच कर्मचारी कामावर आले नाहीत. कामावर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासन योग्य कारवाई करेल. वेतनवाढ मान्य नसेल तर अशा कर्मचाऱ्यांनी औद्योगिक न्यायालयात जावे. कोणतीही कामगार संघटना नेते समोर न येता कर्मचाऱ्यांना अडचणीत आणत आहेत. एसटी प्रशासन योग्य कारवाईबाबत भूमिका घेईल. कर्मचारी नुकसान नको ही भूमिका माझी आहे.'' 

"कामगारांच्या भावनांची दखल घ्या' 
कोणत्याही संघटनेने संपाची नोटीस दिलेली नाही. तरीही राज्यातील एसटी कामगार संपावर गेले आहेत. याचाच अर्थ ऐतिहासिक वेतनवाढ म्हणून महामंडळाकडून केली गेलेली घोषणा कामगारांना समाधानकारक नाही हेच सिद्ध होते. आता तरी कामगारांच्या भावनांची दखल घ्यावी, असे आवाहन मान्यताप्राप्त एसटी कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आले आहे. 

Web Title: This is not a MSRTC strike says Diwakar Raote