शिवसेना शहर प्रमुखांना मुरबाड नगर पंचायतीची नोटीस

मुरलीधर दळवी
रविवार, 6 मे 2018

शिवसेना मुरबाड शहर शाखेचे बांधकाम सुरु करून नगर पंचायतीला कर आकारणी करावी म्हणून पत्र दिले होते. त्यावर नगर पंचायतीने हे बांधकाम अनधिकृत असल्याने तीस दिवसाच्या आत तोडण्याची नोटीस बजावली आहे. 

मुरबाड (ठाणे) - येथील शिवाजी चौकात बांधलेल्या शिवसेना शाखेचे बांधकाम तोडण्याची नोटीस मुरबाड नगर पंचायतीने शिवसेना शहर प्रमुख रामभाऊ दुधाळे यांना दिली आहे.

मुरबाड शहर शिवसेना प्रमुख राम दुधाळे यांनी शिवाजी चौकात पोलिस ठाण्याजवळच शिवसेना मुरबाड शहर शाखेचे बांधकाम सुरु करून नगर पंचायतीला कर आकारणी करावी म्हणून पत्र दिले होते. त्यावर नगर पंचायतीने हे बांधकाम अनधिकृत असल्याने तीस दिवसाच्या आत तोडण्याची नोटीस बजावली आहे. 

मुरबाड शहरात रस्त्यालगतच्या अनधिकृत व्यापारी गाळ्यावरही नगर पंचायतीने कारवाईच्या नोटीसा बजावुन बराच कालावधी लोटला आहे. मात्र त्या गाळ्यांवर नगर पंचायतीने कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे ही नोटीस म्हणजे कागदी घोडे नाचवण्याचा फार्स असल्याची चर्चा आहे.

सदर बांधकाम चर्चेचा विषय बनला असुन नगरपंचायतीच्या नोटिसी नंतर शिवसेना शहर शाखेत संताप व्यक्त होत आहे. मात्र या बांधकामावर कारवाई करण्यापुर्वी शहरातील अनधिकृत बांधकामावर कधी कारवाई करणार याची विचारणा करणार असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Notice of Murbad Nagar Panchayat to Shiv Sena city chief