अंगणवाड्या झाल्या स्मार्ट ; सेविका नोंदविणार स्मार्टफोनद्वारे माहिती

ulhasnaggar.jpg
ulhasnaggar.jpg

उल्हासनगर : एकात्मिक बाल विकास प्रकल्पा अंतर्गत उल्हासनगरातील 210 अंगणवाडयांना स्मार्टफोन देण्यात आले असून, अंगणवाडी सेविकांना त्यांच्या वापरा संबंधीचे प्रशिक्षण दिले गेले आहे. त्यामुळे अंगणवाड्या आता स्मार्ट झाल्या आहेत.

 कै. विजयाताई पवार विद्यालय येथे विभाग क्रमांक सात व आठच्या सेविकांचे मोबाईल वापरासंबंधीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. आय सी टी- आर टी एम अंतर्गत सीएएस प्रशिक्षणामध्ये सेविकांना स्मार्टफोनमध्ये रजिस्टर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या रजिस्टरमध्ये कौटुंबिक माहिती कशी भरावी याचे सखोल प्रशिक्षण मुख्यसेविका श्रुतिका मोहिते, शोभा चौगुले यांनी सेविकांना दिले. प्रशिक्षणासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी राहुल मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

पूर्वी अंगणवाडी सेविका घरोघरी जावून गरोदर महिला, बाळाचा जन्म, कुपोषित बालक, यांची माहिती रजिस्टर मध्ये नोंद करत असत. आता स्मार्टफोन मध्ये रजिस्टर उपलब्ध करून देण्यात आल्याने अंगणवाडी सेविकांचे काम सोपे झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com