रेल्वे प्रवाशांसाठी आता "Digilocker'! सीएसएमटी, एलटीटी, दादरमध्ये अत्याधुनिक सुविधा 

कुलदीप घायवट
Thursday, 21 January 2021

भारतीय रेल्वेत महसूल वाढविण्यासाठी रेल्वेमंत्र्यांनी "न्यू इनोव्हेटिव्ह नॉन फेअर रेव्हेन्यू आयडीयाज स्कीम' (एनआयएनएफआरआयएस) आणली आहे

मुंबई  : भारतीय रेल्वेत महसूल वाढविण्यासाठी रेल्वेमंत्र्यांनी "न्यू इनोव्हेटिव्ह नॉन फेअर रेव्हेन्यू आयडीयाज स्कीम' (एनआयएनएफआरआयएस) ( new Innovative Non Fare Revenue Ideas Scheme ) आणली आहे. यामार्फत महसूल वाढविण्यासाठी अनेक योजना राबवणे सुरू केले आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दादर रेल्वेस्थानकावर डिजिटल लॉकर सुविधा उभारण्याची योजना आहे. 

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात अत्याधुनिक डिजिटल लॉकर सुविधा रेल्वे प्रवाशांना मिळणार आहे. ही सुविधा देण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांत ही सुविधा मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दादर या प्रमुख रेल्वेस्थानकांत सुरू होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना चांगली सुविधा मिळणार आहे. 

मध्य रेल्वेच्या स्थानकांवर पारंपरिक पद्धतीची क्‍लॉक-रूम लॉकर सुविधा होती. जिथे प्रवाशांना आपल्या लगेजसाठी प्रत्यक्ष जाऊन लॉकर सुविधा घ्यावी लागत होती. त्यामुळे प्रवाशांचा वेळ खर्च होत होता; मात्र आता मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दादर या तीन प्रमुख रेल्वेस्थानकांवर आता अत्याधुनिक डिजिलॉकर सुविधा प्रवाशांना मिळणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

कसे असणार डिजिलॉकर? 

  • - पूर्णपणे अत्याधुनिक 
  • - प्रवाशांना प्रथम लॉकरची निवड करावी लागणार 
  • - आवश्‍यक रक्कम जमा केल्यानंतर लॉक उघडणार 
  • - लॉकरमध्ये सामान ठेवल्यावर पावती मिळेल 
  • - सामान पुनर्प्राप्त करताना क्‍यूआर/बार कोड असलेली पावती स्कॅन केल्यानंतर लॉकर उघडेल 
  • - डिजिटल पेमेंट सुविधा, आरएफआयडी टॅग प्रवेश, ऑनलाईन माध्यम पावती सुविधा 

Now Digilocker for railway passengers State of the art facilities at CSMT, LTT, Dadar new Innovative Non Fare Revenue Ideas Scheme

-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now Digilocker for railway passengers State of the art facilities at CSMT, LTT, Dadar