भाजपनंतर आता मनसे संजय राऊतांवर आक्रमक; लगावला सणसणीत टोला

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 June 2020

संजय राऊतांच्या टीकेला भाजप नेते राम कदम यांनी पलटवार केला आहे. त्यानंतर मनसेनं देखील संजय राऊतांना टोला लगावला आहे. 

मुंबई: अभिनेता सोनू सूद यानं केलेल्या कामावर सामनाच्या रोखठोक सदरातून टीका करण्यात आली आहे. सोनूनं लॉकडाऊनच्या काळात इतर राज्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. यावरुन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी याबाबत अनेक प्रश्न उपस्थितीत केले. संजय राऊतांच्या टीकेला भाजप नेते राम कदम यांनी पलटवार केला आहे. त्यानंतर मनसेनं देखील संजय राऊतांना टोला लगावला आहे. 

हेही वाचा: सोनू सूदच्या पाठिशी भाजप; संजय राऊतांच्या लिखाणावर टीका..

मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी आपल्या ट्विटरवरुन संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. माननीय संजय राऊत, या सगळ्यात आपण हा अग्रलेख लिहीण्या पलिकडे काय केलत? ज्याने काम केलय त्याचं कौतुक करूया...
मनाचा मोठेपणा दाखवुया...असो ‘रडण्या’ पलिकडे तुमच्याकडुन काय अपेक्षा ठेवणार...  असं ट्विट खोपकर यांनी करत त्यांना टोला लगावला. एवढंच काय तर ट्विटच्या शेवटी हॅगटॅग #बसारडत असं देखील लिहिलं आहे.  

 

 

लेखात काय म्हटलं होतं संजय राऊतांनी:

शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'त लिहिलेल्या रोखठोक या स्तंभात राऊत यांनी सोनू सूद प्रकरणावर सविस्तर भाष्य केलंय. सोनू सूदला पुढे करत ठाकरे सरकार अपयशी ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय असं राऊत यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे. 

ठाकरे सरकारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न: 

महाराष्ट्राला सामाजिक चळवळीची मोठी परंपरा आहे. यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून ते बाबा आमटेंपर्यंत अनेकांची नावं आहेत, आता यामध्ये सोनू सूदचं नाव घेतलं जाईल. मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करताना सोनूची छायाचित्र, व्हिडीओ प्रसिद्ध झाले. सरकार मजुरांना पोहचवण्यात अपयशी ठरलं, पण सोनूसारखे महात्मा हे काम किती सहजतेने करत आहेत असा प्रचार समाजमाध्यमांमध्ये सुरु झाला. खऱ्या कलाकाराला पडदाच लागतो असे नाही, हे महात्मा सूद याने दाखवून दिले, अशी खोचक टीका या सदरातून केली आहे.

हेही वाचा: संजय राऊत सोनू सूदवर घसरले, म्हणाले...

सोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातले काही राजकीय घटक ‘ठाकरे सरकार’ला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत होते. सोनू सूद हा ‘महाबली’, :बाहुबली’ किंवा ‘सुपरहीरो’ आहे असे चित्र रंगवण्यात हे राजकीय पक्ष काही प्रमाणात यशस्वी झाले. भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले ( हे दत्तक विधान गुप्त पद्धतीने झाले.) आणि त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला.

now MNS criticizes sanjay raut on sonu sood topic


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: now MNS criticizes sanjay raut on sonu sood topic