आता मुंबई-हावडा विशेष ट्रेन दररोज धावणार; विदर्भातील शहरांमध्ये जाणाऱ्यांना दिलासा

आता मुंबई-हावडा विशेष ट्रेन दररोज धावणार; विदर्भातील शहरांमध्ये जाणाऱ्यांना दिलासा

मुंबई :प्रवाशांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हावडा विशेष ट्रेन त्रैसाप्ताहिक ऐवजी फेऱ्यांमध्ये वाढ करून दररोज चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागपूरसह विदर्भातील इतर शहरांमध्ये प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

यामध्ये 02809 विशेष पूर्णतः राखीव असेल व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  येथून 8 ऑक्टोबर पासून दररोज रात्री 8.35 वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी हावडा येथे पहाटे 5.46 वाजता पोहोचेल. तर 02810 विशेष पूर्णतः राखीव असून 6 ऑक्टोबर पासून दररोज हावडा येथून रात्री 8.5 वाजता सुटणार असून तिसर्‍या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पहाटे 5.20 वाजता पोहोचेल.

 दरम्यान वेळापत्रकानुसार तसेच चक्रधरपूर आणि टाटानगरसह या गाडीला थांबे देण्यात आले असून 6 ऑक्टोबर पासून सर्व पीआरएस केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर आरक्षण खुले करण्यात येणार आहे.

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com