मुरबाड ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळणार

मुरलीधर दळवी
मंगळवार, 1 मे 2018

मुरबाड : मुरबाड ग्रामीण रुग्णालयातील शस्रक्रिया गृहाचे उद्घाटन आमदार किसन कथोरे यांचे हस्ते आज (मंगळवार) करण्यात आले. या रुग्णालयाचे रूपांतर लवकरच उपजिल्हा रुग्णालयात करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी कथोरे यांनी दिली.

या कार्यक्रमासाठी राज्याच्या आरोग्य विभागाचे संचालक संजय कांबळे, ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक केम्पी पाटील, मुरबाडचे नगराध्यक्ष मोहन सासे, भाजपचे मुरबाड तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव, उपनगराध्यक्ष नारायण गोंधळी उपस्थित होते.

शस्रक्रियागृह सुरु झाल्यामुळे मुरबाड ग्रामीण भागातील लोकांना कुटुंब नियोजन, नेत्र, सिझरीन अशा शस्रक्रियांसाठी खाजगी रुग्णालयात अथवा कल्याण-मुंबईकडे जावे लागणार नाही.

मुरबाड येथील ग्रामीण रुग्णालयात सध्या 30 खाटांची सोय आहे. आणखी 20 खाटांची सोय उपलब्ध होण्यास शासकीय मान्यता मिळाली आहे. तसेच 20 खाटांचे ट्राॅमा केअर युनिट येत्या दोन-तीन महिन्यांत सुरु होणार असल्याने मुरबाड तालुक्यातील लोकांची आरोग्याची चांगली सोय होणार असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले

कल्याण नगर राष्ट्रीय महामार्गावर माळशेज घाट परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले असल्याने  टोकावडे येथे नवीन ट्रामा केयर युनिट सुरु करणेसाठी प्रयत्न करत असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले.

Web Title: Now Surgery facility available in Murbad Rural Hospital