मुंबईकरांसाठी गुड न्यूज, लॉक डाऊनमधील मुंबईकरांना सरकारने दिली 'ही' मुभा...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 June 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तब्बल ४ लॉकडाऊननंतर आता मिशन बिगिन अगेनची घोषणा केली आहे. यानुसार आता राज्य सरकारनं लॉकडाऊनचे काही नियम शिथिल केले आहेत. त्यात मुंबईकरांना राज्य सरकारनं एक गुड न्युज दिली आहे.

मुंबई: कोरोनामुळे मुंबईवर महाभयंकर संकट ओढवलं आहे. त्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मात्र लॉकडाउनमुळे राज्य सरकारला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तब्बल ४ लॉकडाऊननंतर आता 'मिशन बिगिन अगेन'ची घोषणा केली आहे. यानुसार आता राज्य सरकारनं लॉकडाऊनचे काही नियम शिथिल केले आहेत. त्यात मुंबईकरांना राज्य सरकारनं एक गुड न्युज दिली आहे.

INSIDE STORY : 'ती' सात ७ बेटं, ज्यांना आपण आज मुंबई म्हणतो...

राज्य सरकारनं मिशन बिगिन अगेनअंतर्गत लॉकडाउनसंदर्भात एक नवीन नियमावली जाहीर केली आहे. यात राज्य सरकारकडून बरेच नियम शिथिल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे मुंबईकरांना आता मुंबई महानगरीय क्षेत्रात म्हणजेच MMR विना अत्यावश्यक सेवा पास प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता  ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, बदलापूर या मुंबई MMR क्षेत्रातल्या जिल्ह्यांच्या नागरिकांना जिल्ह्याअंतर्गत विना अत्यावश्यक पास प्रवास करता येणार आहे.

हे आहेत नवीन नियम: 

  • ७ जून पासून घरपोच मिळणार वर्तमानपत्र. मात्र विक्रेत्यानं योग्य ती काळजी घेणं आवश्यक. 
  • सकाळी ५ ते संध्याकाळी ७ या वेळेत सोशल डिस्टंसिंग पाळून सायकलिंग, जॉगिंगची आणि सकाळी चालायला जायची परवानगी. 
  • ओपन एअर जिमसाठी परवानगी नाही.
  • शैक्षणिक संस्थांच्या कर्मचाऱ्यांना काम करण्यास परवानगी. उत्तर पत्रिकांचं मूल्यमापन आणि निकाल जाहीर करणे ही कामं करण्यास परवानगी. 
  • खासगी कार्यालयं ८ जून पासून पुन्हा सुरु करण्यास परवानगी. मात्र  १० कर्मचारी किंवा फक्त १० टक्के कर्मचारी राहतील उपस्थित.  

now travelling will be allowed within MMR region read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: now travelling will be allowed within MMR region read full story