आता मराठीतूनही देता येणार 'सीटीईटी'ची परीक्षा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

देशातील 110 शहरांमध्ये 20 भाषांमध्ये ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी सीबीएसईच्या www.ctet.nic.in या संकेतस्थळावरून अर्ज भरता येणार आहे.

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात येणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) 8 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.

देशातील 110 शहरांमध्ये 20 भाषांमध्ये ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी सीबीएसईच्या www.ctet.nic.in या संकेतस्थळावरून अर्ज भरता येणार आहे. तर परीक्षेसंदर्भातील सर्व माहिती संकेतस्थळावर 19 ऑगस्टला उपलब्ध करून देण्यात येईल.

संकेतस्थळावर माहिती उपलब्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर परीक्षेचे शुल्क 18 ते 23 सप्टेंबरपर्यंत दुपारी 3.30 वाजेपर्यंत ऑनलाईन भरता येणार असल्याची माहिती सीबीएसईने परिपत्रकाद्वारे जारी केली. 

सर्व भारतीय भाषांमध्ये परीक्षा देता येणार
सीटीईटी परीक्षा सर्व भारतीय भाषांमध्ये घेण्यात येईल. इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गारो, गुजराती, कन्नड, खासी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, मिझो, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू, तिबेटी आणि उर्दू या भाषांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now we can give CTET exam from Marathi