खुशखबर! मुंबईत कोरोना रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण घसरतंय... वाचा कोणी दिली ही माहिती

भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा  | Wednesday, 29 July 2020

मुंबईत दररोज कोरोना रुग्ण दाखल होत असले तरीही सध्या हे प्रमाण घसरत असल्याचे निरीक्षण कोरोना मृत्यू निरीक्षण समिती कडून मांडण्यात आले आहे.

 

मुंबई ः मुंबईत दररोज कोरोना रुग्ण दाखल होत असले तरीही सध्या हे प्रमाण घसरत असल्याचे निरीक्षण कोरोना मृत्यू निरीक्षण समिती कडून मांडण्यात आले आहे. असे जरी असले तरी या परिस्थितीला गाफिल न राहता 
रोजच्या व्यवहारात मास्क, सोशल डिस्टंसिन्ग आणि हात पाय धुणे या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे मत तद्य डॉक्टर्स व्यक्त करतात. 

कोरोना नसतानाही आमच्या पेशंटवर कोविड औषधांचा वापर, म्हणूनच रुग्णाचा झाला मृत्यू", मुंबईतील रुग्णालयाबाहेर नातेवाईकांचा गोंधळ

मुंबईतील कोरोना संसर्ग कधी कमी होणार? असा प्रश्न सर्वच मुंबईकरांना पडला असताना कोरोना मृत्यू निरीक्षण समिती प्रमुख डॉ अविनाश सुपे यांनी कोरोना रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण कमी झाले असल्याचे सांगितले. सध्या दाखल गंभीर कोरोना रुग्ण तीन हजारापर्यंत आहे. यातही रोजचे येण्याचे प्रमाण कमी झाले आहे.  मुंबईत कोरोना रुग्ण दररोज आढळत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, एप्रिल, मे तसेच जूनच्या आकडेवारीची या समितीने तुलना केली असता हे प्रमाण सतत खाली येत असल्याचे निरीक्षण मांडले आहे. यावर अधिक माहिती देताना डॉ. सुपे म्हणाले, कि मे आणि जून महिन्यात आठवड्याला दहा हजार कोरोना रुग्ण रुग्णालयात दाखल होत होते. सध्या आठवड्याला 7 ते साडे सात हजार रुग्ण दाखल होत आहे. याचाच अर्थ रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण स्थिरावले आहे. शिवाय, आरोग्य सेवा बळकट झाली असून त्या तुलनेत रुग्ण संख्या ही स्थिरावली आहे.

 

कोरोना रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण आठवड्याला चार ते पाच हजारावर आल्यास नियंत्रणात येत असल्याचे म्हणू शकतो. हेच प्रमाण पाचशे संख्येपर्यंत गेल्यास अधिक चांगली बाब होईल. त्यामूळे, कोरोनाचे प्रमाण कमी करण्यावर सातत्याने भर दिला जात आहे. 

-डॉ. अविनाश सुपे, कोरोना मृत्यू निरीक्षण समिती प्रमुख

-----------------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे