पनवेलमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 400 च्या उंबरठ्यावर, तर दिवसभरात...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 May 2020

मानखुर्द येथे वडीलांच्या अंत्यविधीला उपस्थित राहिलेली नवीन पनवेलमधील महिला कोरोनाबाधित झाली आहे. नवी मुंबईमधून पनवेल तक्का येथील मुलाकडे राहायला आलेल्या महिलेला सुद्धा कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे.  

पनवेल : पनवेल पालिका हद्दीत सोमवारी नव्याने 22 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे येथील रुग्ण संख्या 393 वर जाऊन पोहचली आहे.

नक्की वाचा : उत्तर प्रदेश सोशल मीडिया डेस्कला धमकी देणारा आला गोत्यात, महाराष्ट्रातल्या 'या' जिल्ह्यातून अटक

मानखुर्द येथे वडीलांच्या अंत्यविधीला उपस्थित राहिलेली नवीन पनवेलमधील महिला कोरोनाबाधित झाली आहे. नवी मुंबईमधून पनवेल तक्का येथील मुलाकडे राहायला आलेल्या महिलेला सुद्धा कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. गेल्या दोन दिवसात तळोजा पेठ तसेच नवीन पनवेल येथील प्रत्येकी एका महिलेचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे पालिका हद्दीतील मृतांचा आकडा 18 वर जाऊन पोहचला आहे.

महत्वाची बातमी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी, आठवड्याभरात मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा दर 'इतका' वाढला

तर विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेले 9 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 217 इतकी झाली आहे. पालिका हद्दीत सद्य स्थितीत 158 रुग्ण विविध रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असल्याचे प्रशासनाने सांगितले.

number of corona victims in Panvel is on the threshold of 400, while during the day 22 corona positive


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of corona victims in Panvel is on the threshold of 400, while during the day 22 corona positive